मुंबई : बीड जिल्ह्यातील ललिता साळवे हिच्यावर शुक्रवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंग परिवर्तनाच्या शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला. यातून सावरत असलेल्या ललितने सांगितले की, त्रास होतोय, वेदनाही होताहेत. मात्र, या सगळ्या पलीकडे समाधानाची भावना असल्याचे त्याने अधोरेखित केले. पहिल्या टप्प्यात जननेंद्रियावर शस्त्रक्रिया केल्याने ललितच्या आहारावर नियंत्रण आले आहे. त्यामुळे शनिवारी ललितला बोलण्यास त्रास होत होता. परिणामी, अशक्तपणा आणि वेदना त्याच्या चेहऱ्यावरही प्रतिबिंबित होत होती.आपल्या पोटच्या मुलाला या खडतर प्रवासातून जात असल्याचे पाहताना ललितच्या आईला रडू कोसळले. डोळ्यांत तरळलेल्या अश्रूंना पदराच्या कोपराने लपवत, अशा परिस्थितीत ललितला पाहणे अवघड जात आहे, अशी प्रतिक्रिया त्याची आई केशरबाई साळवे यांनी दिली.शेती आणि मोलमजुरीचे काम करणाºया साळवे कुटुंबीयांची परिस्थिती फारशी बरी नसल्याने ललित लहानपणापासूनच मामाच्या घरी राहत होता. ललितला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. त्या तिघांचेही लग्न झाले आहे. साळवे कुटुंबीयात शिक्षण घेतलेला ललित एकमेव सदस्य आहे. ललितकडे बी.कॉमची पदवी आहे, अशी माहिती ललितच्या कुटुंबीयांनी दिली.ललितच्या या वेगळ्या जाणिवांविषयी अधिक विचारले असता, त्याच्या आईने सांगितले की, ललित चार वर्षांचा झाल्यानंतर थोडासा अंदाज आला होता, परंतु त्यानंतर तो मामाकडे राहायला गेल्यानंतर त्याच्या मासिक पाळीविषयी, मुलींमध्ये होणाºया शारीरिक-मानसिक बदलांविषयी कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. ललितच्या या लिंग परिवर्तनाविषयी मामाने माहिती दिल्यावर आम्ही कोसळलोच होतो, त्यामुळे मानसिक धक्का बसल्याचे सांगत ललितच्या आईला रडू आवरले नाही.लिंगपरिवर्तनाविषयी कळल्यानंतर काहीशी भीती-शंका मनात होत्या. मात्र, आता ललितचे स्वप्न पूर्ण होत असल्याने बरे वाटत आहे. याशिवाय, या निर्णयाला ललितच्या कुटुंबीयांचा आणि गावातील समुदायाचा पाठिंबा असल्याने कृतज्ञतेची भावना आहे. आता यापुढे आम्ही त्याला ‘ललित’च हाक मारणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.- भरत बनसोडे, ललितचे काका.स्थिर होण्यासाठी आणखी २-३ दिवसशस्त्रक्रिया झाल्यानंतर सध्या ललितला केवळ द्रव पदार्थांवर ठेवण्यात आले आहे. संपूर्ण आहारामुळे नैसर्गिक विधीसाठी त्रास होऊ शकतो. बेडवरच या विधी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याने संसर्गाचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे रुग्णाची प्रकृती स्थिर होण्यासाठी आणखी २-३ दिवस जातील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
त्रास होतोय, पण समाधान वाटतेय! ललितची शस्त्रक्रियेनंतरची प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 5:52 AM