शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

एव्हरशाइन सिटीत मोकाट गुरांचा सुळसुळाट

By admin | Published: July 21, 2016 3:37 AM

वसई पूर्वेतील एव्हरशाईनसिटीत मोकाट गुरांचा मुक्त संचार व सुळसुळाट झाल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.

वसई : वसई पूर्वेतील एव्हरशाईनसिटीत मोकाट गुरांचा मुक्त संचार व सुळसुळाट झाल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मोकाट गुरांवर प्रतिबंध घालण्याबाबत कोणतीही ठोस पाऊले उचलली जात नसल्याने नागरीकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. मोकाट जनावरे कळपा-कळपाने रस्त्यावर बसत असल्याने नागरिक, विद्यार्थी व वाहनचालकांना वाहतुकीस मोठया प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे मोकाट गुरांना कोंडवाडयात पाठवावे, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.एव्हरशाईनसिटीत जीएसके, विद्याविकासिनी, होली फॅमीली, सेठ विद्यामंदिर, सेठ विद्यामंदिर अशा चार मोठ्या शाळा व कॉलेज आहेत. यातील सकाळच्या सत्रातील शाळा सकाळी सात वाजता भरतात. याच वेळी एव्हरशाईनसिटी लास्टस्टॉप येथे असलेल्या आदर्शनगर डोंगरीतील तबेल्यांमधून गाई व म्हशी चरण्यासाठी सोडल्या जातात. तबेल्यातून निघालेल्या गाई, म्हशी त्यानंतर परिसरात अक्षरश धुमाकूळ घालतात. अनेकदा ही जनावरे सैरावैरा पळतांना विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जात असल्याने विद्यार्थ्यांची पळापळ होते. तसेच एव्हरशाईनसिटीतील मुख्य रस्त्यांसह अनेक ठिकाणी मोकाट गुरांनी कळपा-कळपाने ठाण मांडत असल्याने वाहतूक कोंडी होत असते. रस्त्याच्या मधोमध बसलेल्या या गुरांना हकल्यास ती अंगावर धावून येतात. त्यामुळे वाहनचालक किंवा नागरिकही त्यांना हटवण्याची हिम्मत करत नाही. गुरे तासान् तास सार्वजनिक ठिकाणी बसलेली असतात. त्यांच्या मल-मूत्रामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहन घसरून अपघात होण्याचे प्रकारही येथे घडतात, असे काही चालकांनी सांगितले. (प्रतिनिधी)>व्यापाऱ्यांनाही फटका, तबेलेवाल्यांना आवराएव्हरशाईनसिटी मुख्य रस्त्यावर अनेक दुकाने आहेत. या दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या वस्तू, धान्य देखील ही गुरें खात असल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. मोकाट गुराढोरांच्या वाढत्या उपद्रवाबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी करुनही पालिका प्रशासनाकडून मात्र कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिकेने आदर्शनगर डोंगरीत असलेल्या अवैध तबेल्यांवर कारवाई केल्यास किंंवा तबेला मालकांना जनावर रस्त्यावर सोडण्यास मनाई करण्याची ताकीद दिल्यास मोकाट गुरांच्या सुळसुळाटाला प्रतिबंध बसणे शक्य आहे. परंतु पालिका प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नागरीकांना व विद्यार्थ्यांना मात्र दैनंदिन मोकाट जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे.