शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

५५० रुपयांमध्ये हजाराची नोट

By admin | Published: November 16, 2015 3:43 AM

बांगलादेशमार्गे भारतात दाखल झालेल्या एक हजार रुपयांच्या बनावट नोटा अवघ्या ५५० रुपयांमध्ये ठाण्यात वटवल्या जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात उघड झाली आहे.

जितेंद्र कालेकर,  ठाणेबांगलादेशमार्गे भारतात दाखल झालेल्या एक हजार रुपयांच्या बनावट नोटा अवघ्या ५५० रुपयांमध्ये ठाण्यात वटवल्या जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात उघड झाली आहे. या पथकाने एक बांगलादेशी नागरिक व बनावट नोटा चलनात आणणारे एजंट यांचे रॅकेट उघड केले आहे.पकडलेल्या बांगलादेशीकडे भारतीय आधारकार्ड आणि पॅनकार्ड मिळाले असून, त्याच्याकडून आतापर्यंत एक हजारांच्या ४०८ तर शंभर रुपयांच्या २० अशा चार लाख दहा हजारांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अगदी हुबेहूब वाटतील अशा या बनावट नोटा आहेत. या प्रकरणी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकासह भारतीय गुप्तचर विभागाच्या (आयबी) अधिकाऱ्यांनीही यातील आरोपींची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अलीकडेच ठाण्याच्या सिडको बसस्टॉपवर एक हजारांच्या बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या अब्दुल्ला सिकंदर उर्फ मोटू शोपान मंडल, मोहंमद सोबुज मोटर खान आणि नजमुल हसन अहमद अली शेख या तिघांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी, उपनिरीक्षक मनोहर घाडगे आणि हवालदार उत्तम भोसले यांच्या पथकाने घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडून एक हजारांच्या ४० बनावट नोटा मिळाल्या. त्यानंतर, त्यांनी वेगवेगळ्या दुकानांत वटविलेल्या एक हजारांच्या आणखी दोन बनावट नोटाही या पथकाने मिळविल्या. बांगलादेशी असलेल्या अब्दुल्लाकडून भारतीय आधारकार्ड आणि पॅनकार्डही हस्तगत केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो मुंब्रा भागात वास्तव्याला होता. त्याने बांगलादेशातील महाबूल, राजू आणि मनिरुल या तिघांच्या मदतीने एक हजारांच्या नोटा वटविण्यासाठी आणल्याची माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी त्याच्या मुंब्य्रातील घरातून एक हजार रुपये दराच्या ३६४ अर्थात तीन लाख ६४ हजारांच्या आणखी बनावट नोटा हस्तगत केल्या. त्याच्या घराच्या झडतीमध्ये खरेदी केलेले नवीन कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, मोबाइल आणि बॅगाही मिळाल्या. मोहंमद खान हा मूळचा पश्चिम बंगालचा तर नजमुल हा अहमदाबाद, गुजरातचा रहिवासी असून या दोघांनीही नोटा वटविण्यासाठी अब्दुल्ला याला मदत केली. दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरात या टोळीने बनावट नोटा वटवल्या आहेत.गॅस कनेक्शनही मिळविलेअब्दुल्ला याने कर्नाटक बँकेच्या डोंबिवली शाखेत खाते उघडले आहे, तसेच त्याने मुंब्रा येथून गॅस कनेक्शनही मिळविले. आता या बँक खात्याची आणि त्याने मिळवलेल्या गॅस कनेक्शनची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.पाकिस्तानमध्ये निर्मिती झालेल्या या नोटा थेट भारतात आणण्याऐवजी आधी बांगलादेशात नेल्या जातात. बांगलादेशात एक हजार रुपयांच्या एका नोटेकरिता ३५० रुपये एजंटांना दिले जातात. भारतात ४५० रुपयांच्या मोबदल्यात या नोटा घेतल्या जातात, तर भारतात त्या वटविताना ५५० रुपयांना त्यांची विक्री होते. या नोटा वटविण्यासाठी किरकोळ दुकानांमधून ३०० ते ४०० रुपयांचे सामान खरेदी केले जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली. अलीकडेच एटीएसच्या ठाणे पथकानेही भिवंडीतून काही बांगलादेशींना अटक केली होती. त्यांच्याकडूनही अधिकृत आधार आणि पॅनकार्ड हस्तगत करण्यात आले होते.