भरत बुटाले/लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील अवलिया गोसेवक डॉ. अवधूत सोळंकी यांनी दररोज ५०हून अधिक गार्इंच्या उदरभरणाचा वसाच घेतला आहे. गेली दोन वर्षे त्यांचा हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. आज ‘वसू बारस’निमित्त सोळंकी यांच्या कार्याचा हा आढावा.बीएचएमएस पदवीधर असलेले ३७ वर्षीय डॉ. अवधूत सोळंकी येथील सागरमाळ परिसरात कुटुंबासह राहतात. या कुटुंबीयांची सकाळ इतरांपेक्षा जरा वेगळीच असते. सकाळी साडेसहा वाजले की, त्यांच्या दारात परिसरातील गाई येण्यास सुरुवात होते. त्याच वेळी अवधूत यांचे काम सुरू होते. तब्बल २२ बुट्ट्या कोंडा ते दारात जमलेल्या गो‘कुळा’समोर ठेवतात. ‘हरे कृष्ण.. हरे कृष्ण’चा जप करीतच ते गाई-वासरांच्या पाठीवर, मुखावर वात्सल्याचा हात फिरवत रमून जातात. त्यांच्या पत्नी लक्ष्मी दारातील दोन-तीन कुंड्यांमध्ये गार्इंसाठी पाण्याची व्यवस्था करतात. दररोज ३४ किलो गव्हाचा कोंडा या गार्इंना वाढण्यात येतो. दारात, तसेच रस्त्यावर पडलेली शेण व घाण अवधूत यांच्या आई जमुना एका महिलेच्या मदतीने खराट्याने झाडून टाकतात. एकही दिवस गार्इंना खाद्य चुकू नये, म्हणून सोळंकी कोल्हापूर सोडून कुठेही वस्तीला राहात नाहीत.महिन्याला १५ हजारांचे खाद्यअशीही काळजीएक दिवस या गोतावळ्यातील वासरू ढकलाढकलीत गटारात पडून जखमी झाले. अशी घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून अवधूत यांनी स्वखर्चाने तेथील गटारांवर सिमेंटचे ब्लॉक बसविलेत. त्यामुळे गार्इंना तेथे थांबणे आणि फिरणेही सोईस्कर झाले.कोंड्याने भरलेले एक पोते दररोज गार्इंसाठी रिते करतात. ३४ किलोंच्या या पोत्याचा दर सुमारे ५०० ते ५५० रुपये आहे. साहजिकच महिन्याला हा खर्च १५ हजारांच्या घरात जातो.‘भगवद्गीते’ने मला हा मार्ग दाखविला. जसा मी या कार्यात गढून गेलो, तसा माझा ताण कमी झालाच, शिवाय दररोज मिळणारा आनंद माझ्यासह कुटुंबाला सुखावून जातो. या कामामुळे मी केवळ सायंकाळीच रुग्णांची तपासणी करतो.- अवधूत सोळंकी
‘तो’ दररोज करतो ५० गार्इंचे उदरभरण!, वसुबारस विशेष; कोल्हापूरच्या अवलियाची ‘गो’सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 4:31 AM