मुंबई- सरासरी ३२, ३४ अंशावर असणारे मुंबईचे कमाल तापमान थेट ३८ अंशावर पोहोचले आहे. वाढत्या तापमानासह सूर्याची प्रखर किरणे आग ओकत असून, कोरडे वारे यात भर घालत आहेत. अशाच काहीशा ‘ताप’दायक वातावरणाने मुंबईतला उन्हाळा सुरू झाला असून, हे ‘पारा’यण आता पुढील तीनएक महिने सुरू राहणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे.
‘ताप’दायक उन्हाने मुंबई होरपळली
By admin | Published: February 27, 2017 5:27 AM