अजित पवारांनी एकदाही पक्षाचं पद उपभोगलं नाही; आव्हाडांची टीका, दादा गटाचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 01:29 PM2023-11-25T13:29:00+5:302023-11-25T13:30:28+5:30

शरद पवारांनी घामाचा एक एक थेंब गाळून हा पक्ष वाढवला आहे. २००४ मध्ये तोंडातून रक्त वाहत असतानाही प्रचाराला फिरले आहेत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

He has not held any post of the party Jitendra Awhad criticism of Ajit Pawar, | अजित पवारांनी एकदाही पक्षाचं पद उपभोगलं नाही; आव्हाडांची टीका, दादा गटाचाही पलटवार

अजित पवारांनी एकदाही पक्षाचं पद उपभोगलं नाही; आव्हाडांची टीका, दादा गटाचाही पलटवार

मुंबई - खरी राष्ट्रवादी कुणाची हा वाद निवडणूक आयोगासमोर सुरू असून शरद पवार आणि अजित पवार गट एकमेकांवर आरोप करत आहेत. शुक्रवारच्या सुनावणीत शरद पवार गटाने अजित पवारांच्या कार्यशैलीवर प्रश्न उभे केले. शरद पवारांनी रक्त आटवून पक्षाचा विस्तार केला. अजित पवारांचा पक्षाच्या विस्तारासाही कुठलाही हातभार नाही. अजित पवारांनी एकदाही पक्षाचे पद उपभोगले नाही अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी अजितदादांवर निशाणा साधला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवारांनी घामाचा एक एक थेंब गाळून हा पक्ष वाढवला आहे. २००४ मध्ये तोंडातून रक्त वाहत असतानाही प्रचाराला फिरले आहेत. मांडीचे हाड मोडले असतानाही पक्षाचे काम केले. त्याला पक्षासाठी प्राण देणे म्हणतात.अजित पवारांनी आजपर्यंत एकदाही पक्षाचे पद उपभोगले नाही.त्यामुळे पक्ष वाढवण्यात, एका पोराला मोठं करण्यात बापाचे योगदान असते तर शरद पवारांनी पक्षासाठी दिले आहे असं त्यांनी सांगितले. 

जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर राष्ट्रवादी अजित पवार गटानेही पलटवार केला. अजित पवार आणि शरद पवारांनी तुम्हाला राज्यात वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपद देत राज्यात काम करण्याची संधी दिली.आता महाविकास आघाडीत गृहनिर्माणसारखे इतके मोठे पद दिले. परंतु तुम्हाला एवढे सर्व दिले असताना ठाणे, पालघर जिल्ह्यात तुमच्या त्रासाला कंटाळून किती लोक राष्ट्रवादी सोडून गेले आणि तुमचे पक्षवाढीसाठी किती योगदान आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीने अजितदादांच्या नेतृत्वाला बोलणे म्हणजे आकाशाला लाथा मारण्यासारखे आहे असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आव्हाडांना दिले आहे. 

निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय घडले?
शुक्रवारच्या सुनावणीत शरद पवार गटानं २०१९ पासूनचा घटनाक्रम वाचून दाखवला.जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले होते. त्यामुळे पक्षाला ५४ जागा मिळाल्या. राज्यात निकालानंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. अजित पवारांचा कुठलाही हातभार पक्षविस्तारात नाही किंवा त्यांची भूमिकाही नाही. त्यांना केवळ पक्षावर ताबा हवा. पक्ष संघटनेत अजित पवारांवर कुठलीही जबाबदारी नाही. ते फक्त राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते होते. ही फूट पक्षातंर्गत नाही तर अजित पवार गटाचा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी अजित पवार गटाने पक्षावर दावा केला असा गंभीर आरोप पवार गटाच्या वकिलांनी केला. 
 

Web Title: He has not held any post of the party Jitendra Awhad criticism of Ajit Pawar,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.