शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

तुरुंगात असताना 'त्यांनी' माझा जीव वाचवला; भुजबळांनी मानले कपिल पाटलांचे जाहीर आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 3:41 PM

जळगावातील ओबीसी परिषदेत छगन भुजबळांची तुफान टोलेबाजी

जळगाव: केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना जेरीस आणण्यासाठी केला जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षावर सातत्यानं केला जातो. यावर बोलताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी परिषदेत तुफान टोलेबाजी केली. भीती वाटत असेल, तर भाजपमध्ये जा, असा उपरोधिक सल्ला भुजबळांनी देताच सभागृहात हशा पिकला.

ओबीसी परिषदेत ओबीसी नेत्यांनी आक्रमक भाषणं केल्यानंतर भुजबळांनी तुफान टोलेबाजी केली. 'इथे सगळे विविध विषयांवर जोरजोरात बोलले. चर्चा केली. पण सावध राहा बाबा. उद्या घरी आयकर विभागवाले आले नाही म्हणजे झालं. जो जो या कामात येईल, त्याला बरोबर ऊस चरख्यात टाकून रस काढला जातो, तसं काढतात. आता सध्या खडसे साहेबांच्या पाठीमागे लागले आहेत,' अशा शब्दांत भुजबळांनी भाजपवर निशाणा साधला.

कपिल पाटील यांचे जाहीर आभारयावेळी छगन भुजबळांनी तुरुंगातील दिवसांची आठवण सांगितली. आमदार कपिल पाटील यांचे भुजबळ यांनी जाहीर आभार मानले. 'मी तुरुंगात असताना कपिल पाटील यांनी माझा जीव वाचवला. मी जेव्हा तुरुंगात टाकलं, तेव्हा एकदा प्रकृती फार बिघडली होती. तुरुंगात सोपी गोष्ट असते. कुणाातरी तुरुंगात टाकायचं. तो आजारी पडला की त्याच्याकडे बघायचं नाही आणि एक दिवस गेल्यावर म्हणायचं की हार्ट अटॅकने गेला. संपला विषय. पण जेव्हा कळलं की भुजबळ एकदम सीरियस आहेत, तेव्हा हे कपिल पाटील विधानमंडळात उभे राहिले. म्हणाले, तुम्ही काय वागणूक देत आहात त्यांना? हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत, नीट काळजी घेत नाहीत. तिथे मारून टाकणार की काय तुम्ही? नंतर शरद पवारांनी पत्रच पाठवलं की भुजबळांना काही झालं, तर हे सरकार जबाबदार राहील. सुदैवाने मी बाहेर आलो,' अशी आठवण सांगत भुजबळांनी पाटील यांचे आभार मानले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळKapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार