- जितेंद्र कालेकर, ठाणेअनेक बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड असलेला यासीन भटकळ याला दिल्लीच्या तिहार कारागृहातून सोडविण्याची जबाबदारी मुदब्बीर शेखवर सोपवली होती. त्यासाठी कारागृहावरच हल्ला करायचा किंवा त्याला न्यायालयात नेतानाच अपहरण करून त्याची सुटका करण्याची योजना होती, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.मुंबईपासून जवळच असलेल्या कर्नाळा अभयारण्यामध्ये इसिसचे प्रशिक्षण केंद्र होणार होते. मात्र त्याऐवजी कर्नाटकला प्राधान्य देण्याची सूचना आली होती, अशी माहितीही चौकशीत पुढे आली आहे.भटकळच्या सुटकेसाठी उत्तर प्रदेशात पकडलेल्या रिझवान अहमद याच्यासह १८ साथीदारांची मदत तो घेणार होता. रिझवान आणि मुदब्बीर यांच्या चौकशीतूनच ही माहिती उघड झाली आहे. मूळचे कर्नाटक राज्यातील इकबाल, रियाज आणि यासीन भटकळ हे तिघेही भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमधील मुख्य संशयित आरोपी आहेत. त्यातील इकबाल आणि रियाज हे दोघे सध्या पाकिस्तानात असल्याचे सांगण्यात येते. कोण आहे यासीन ?यासीन हा इंडियन मुजाहिद्दीनचा अतिरेकी असून, त्याने २००३ मध्ये मुंबईतील झवेरी बाजार येथे बॉम्बस्फोट घडवून आणला होता. याशिवाय दिल्ली, सुरत, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्याच्या जर्मन बेकरी येथील बॉम्बस्फोटांमध्येही तो संशयित आरोपी आहे. कारागृहावर हल्ला ? दमास्कस (सीरियातले एक ठिकाण) येथील आपला मित्र आपल्याला सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे यासीनने त्याच्या मित्राला सांगितल्याची खबर एनआयएला मिळाली. देशभरातील एटीएसची यंत्रणा मागावर होती. मुदब्बीर त्याच्या साथीदारांसह करणार होता.
‘तो’ यासीनला सोडविणार होता
By admin | Published: January 30, 2016 2:03 AM