सुरेंद्र राऊत ल्ल यवतमाळशेतकरी आत्महत्या हे संपूर्ण राज्याचे संकट आहे. सरकार याबाबत संवेदनशील आहे. प्रत्येक गावाला पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण बनविले जाईल. त्यासाठी पाण्याचा ताळेबंद ठेवण्यात येईल. तसेच मागेल त्या शेतकऱ्याला कृषिपंपासाठी वीज जोडणी दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी दीड हजार लोकसंख्येच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त पिंपरी बुटी (ता. यवतमाळ) गावात मुक्काम केला. तेथील विष्णू रंगराव ढुमणे यांच्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी रात्र घालविली. तत्पूर्वी रात्री मुख्यमंत्र्यांनी प्राथमिक शाळेच्या आवारात शेतकऱ्यांशी संवाद साधला. जलयुक्त शिवार अभियान ही सिंचनाची तातडीची व्यवस्था असून यातून विदर्भातील दोन हजार गावांना दुष्काळमुक्त केले जाणार आहे.
मागेल त्याला कृषिपंपासाठी वीजजोडणी
By admin | Published: March 05, 2015 1:26 AM