मुंबई : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली याची अमेरिकेतून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदवण्याचा बुधवारी तिसरा दिवस होता. मात्र तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने विशेष मोक्का न्यायालयाने साक्ष नोंदवण्याचे काम गुरुवारपर्यंत तहकूब केले.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधीची माहिती हेडली व्हिडिओ कॉन्फरन्सने होणाऱ्या साक्षीद्वारे गेले दोन दिवस विशेष न्यायालयाला देत आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय ही लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक आणि लष्करी साहाय्य करीत असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारच्या सुनावणीदरम्यान हेडलीने न्यायालयाला दिली होती. विशेष न्यायालयाने १० डिसेंबर २०१५ रोजी हेडलीला माफीचा साक्षीदार केले आणि ८ फेब्रुवारी रोजी साक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ८ फेब्रुवारीपासून हेडलीची साक्ष नोंदवण्यास सुरुवात करण्यात आली. डेन्मार्क आणि मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी हेडली याला अमेरिकेच्या न्यायालयाने ३५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
तांत्रिक समस्येमुळे हेडलीची साक्ष रद्द; आज नोंदवणार साक्ष
By admin | Published: February 11, 2016 4:00 AM