मुंबई: राज्यात सध्या १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत होत असून परराज्यातून सुमारे ३०० मेट्रीक ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (health minister demands for 500 metric ton oxygen from other state to center)
राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात सध्या ६ लाख ८५ हजार सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १० ते १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. राज्यात सध्या १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत असून तो पूर्णपणे वैद्यकीय कराणासाठी वापरला जातो. त्याशिवाय जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे ३०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात अजून वाढ करून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे, असे टोपे यांनी सांगितले.
“हवं तर हात जोडतो, पण…”; राजेश टोपे यांची नागरिकांना कळकळीची विनंती
जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली वाटप
राज्यात अशा पद्धतीने एकूण १५५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्याचे वाटप केले जात आहे. केंद्र शासन देखील सुमारे ५० हजार मेट्रीक टन ऑक्सिजन आयात करणार असून त्यामाध्यमातूनही राज्याला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता राजेश टोपे यांनी यावेळी वर्तविली आहे.
महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका
तात्पुरते रुग्णालय निर्मिती
राज्यात सहा ठिकाणी अशी आहेत जेथे ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते मात्र त्याठिकाणी बॉटलिंग प्लांटची सुविधा नसल्याने त्याची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे या सहा ठिकाणी जर ५०० बेडची सुविधा असलेले तात्पुरते रुग्णालय निर्मिती करता येणे शक्य आहे याबाबत निर्णय घेण्यात येत आहेत. पेण (जेएसडब्ल्यू), थळ (आर.सी.एफ), वर्धा (लॉइड स्टील), औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा, पारस, परळी अशा सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत आहे. त्याची शुद्धता ९८ टक्के असून, रुग्णाला देता येऊ शकतो. त्यामुळे या सहा ठिकाणी प्रत्येकी ५०० खाटांचे रुग्णालय निर्माण करून रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे नियोजन आहे. त्याची निर्मिती झाल्यावर राज्यात सुमारे ३ हजार खाटांची भर पडणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सरकारसोबत कधी चर्चा केलीय का? फडणवीसांचा प्रियंका गांधींना प्रतिप्रश्न
नागरिकांचे लसीकरणावर भर
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणावर भर देण्यात येणार असून, त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती टोपे यांनी दिली. तसेच सीरम इन्स्टिट्युट सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना प्रति डोस ४०० तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रमाणे दर आकारणार आहे. जागतिक स्तरावर अमेरिकेच्या लसीची किंमत १५००, रशिया आणि चीनच्या लसीची किंमत प्रत्येकी ७५० रुपये असल्याचे सांगतानाच कोविशिल्ड असो की आयात केलेली लस असो त्याचा उपयोग करून राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येईल, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला आहे.