संगमनेर (जि. अहमदनगर) : बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयात कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात फिर्याद दाखल आहे.
याबाबत इंदोरीकर महाराजांनी वकिलामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अपिल केले आहे. त्यामुळे शुक्रवारी संगमनेर न्यायालयात होणाऱ्या सुनावणीला अंतरिम स्थगिती मिळाली आहे, अशी माहिती इंदोरीकर महाराजांचे वकील के. डी. धुमाळ यांनी दिली.