शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

११ जणांच्या अपिलावर सुनावणी

By admin | Published: July 16, 2016 3:13 AM

२००२ बिल्कीस बानू सामुहिक बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या ११ जणांच्या अपिलावरील सुनावणीस शुक्रवारपासून उच्च न्यायालयात सुरुवात झाली.

मुंबई : २००२ बिल्कीस बानू सामुहिक बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या ११ जणांच्या अपिलावरील सुनावणीस शुक्रवारपासून उच्च न्यायालयात सुरुवात झाली. त्याचबरोबर सीबीआयने ११ पैकी तीन जणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी केलेल्या अपिलावरही सुनावणी घेण्यात येणार आहे.२००२ गोध्रा हत्याकाडांनंतर बिल्कीस बानूवर सामुहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने २००८ मध्ये ११ जणांना दोषी ठरवले. या ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा रद्द करण्यात यावी, यासाठी या सर्वांनी उच्च न्यायालयात अपील केला. तर सीबीआयने ११ आरोपींपैकी तीन जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. न्या. व्ही. के. ताहिलरमाणी व न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठापुढे या अपिलांवर सुनावणी होती.सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने उच्च न्यायालयाने वेणेगावकर यांनाच धारेवर धरले. बिल्कीस बानूच्या कुटुंबातील सात जणांच्या मृत्यूचे कारण खंडपीठाने विचारल्यावर अ‍ॅड. वेणेगावकर याचे उत्तर देऊ शकले नाहीत. ‘शवविच्छेदन अहवाल गुजराती भाषेत असल्याने आपल्याला ते कारण कळू शकले नाही,’ असे अ‍ॅड. वेणेगावकर यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त करत म्हटले की, तुम्ही (वेणेगावकर) असे कसे म्हणू शकता? केसला सुरुवात करताना तुम्हाला याची माहिती करून घ्यायला हवी होती. आता दोन दिवस सुटी आहे तर केसचा नीट अभ्यास करा आणि मगच केसला सुरुवात करा.सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २००२ च्या गोध्रा दंगलीनंतर ३ मार्च २००२ रोजी अहमदाबादजवळील राधिकानगर येथे बिल्कीस बानूच्या कुटूंबियांवर हल्ला करण्यात आला. त्यावेळी बिल्कीस पाच महिन्यांची गरोदर होती. अशा अवस्थेत तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. तिच्या कुटूंबातील सहा जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. अहमदाबादमध्ये या खटल्यास सुरुवात झाली. मात्र बिल्कीसने साक्षीदारांवर दबाव आणण्याची आणि सीबीआयने सादर केलेल्या पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, अशी भीती बिल्कीसने व्यक्त केल्याने सर्वोच्च न्यायालयाने आॅगस्ट २००४ मध्ये हा खटला मुंबई न्यायालयाकडे वर्ग केला.सीबीआयच्या म्हणण्यानुसार, शैलेश भट या आरोपीने बिल्कीसच्या तीन वर्षाच्या मुलाला खेचून त्याची हत्या केली. तर जसवंतभाई नै, गोविंदभाई नै आणि नरेश मोरधिया यांनी बिल्कीसला एका झाडापर्यंत खेचत नेले आणि तिथे तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. तसेच आरोपींनी बिल्कीसच्या अन्य नातेवाईकांनाही मारहाण केली.जसवंतभाई, गोविंधभाई, शैलेश भट, राधेश्याम शहा, बिपीनचंद्र जोशी, केसरभाई वोहानिया, प्रदीप मोरधिया, बाकाभाई वोहानिया, राजुभाई सोनी, मितेश भट आणि रमेश चंदन अशी या ११ आरोपींची नावे आहेत. त्यापैकी जसवंतभाई, गोविंदभाई आणि राधेश्याम शाह यांनी बिल्कीसवर बलात्कार केल्याने त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी सीबीआयने मागणी केली आहे. (प्रतिनिधी)