पुढील आठवड्यात सुनावणी; शिंदे, ठाकरेंना बाेलावणार?; विधानसभाध्यक्ष दिल्लीहून परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 06:21 AM2023-09-23T06:21:36+5:302023-09-23T06:22:03+5:30

निर्णयाच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही; परंतु घाईदेखील करणार नाही

hearing next week; Shinde will kill Thackeray?; Speaker Rahul Narvekar returned from Delhi | पुढील आठवड्यात सुनावणी; शिंदे, ठाकरेंना बाेलावणार?; विधानसभाध्यक्ष दिल्लीहून परतले

पुढील आठवड्यात सुनावणी; शिंदे, ठाकरेंना बाेलावणार?; विधानसभाध्यक्ष दिल्लीहून परतले

googlenewsNext

मुंबई - आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुढील आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटांच्या प्रमुखांना बोलावले जाऊ शकते.
सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री आपल्या दिल्ली भेटीत विधिज्ञांशी सविस्तर चर्चा केली.

दिल्लीहून परत आल्यानंतर शुक्रवारी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नार्वेकर म्हणाले, दिल्लीत माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. तसेच अनेक भेटीगाठी होत्या. त्यातील काही भेटी या कायदेतज्ज्ञांसोबत होत्या. आमदार अपात्रतेसंदर्भात जो कायदा आहे त्याच्यात परिस्थितीनुसार वेगवेगळे बदल होत असतात. 

दिरंगाई नाहीच; पण घाईही नाही
आमदार अपात्रतेच्या बाबतीत मी सुनावणी घेऊन निर्णय देणार असल्याने अधिक बोलणे उचित ठरणार नाही. ही बाब न्यायप्रविष्ट आहे. संविधानाने न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांना आपापले कार्यक्षेत्र आखून दिले आहे. त्या कार्यक्षेत्रात राहून सर्वांनी काम करणे अपेक्षित आहे. निर्णयाच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही; परंतु घाईदेखील करणार नाही. सर्व नियम, कायदेशीर आणि संवैधानिक तरतुदी यांचे योग्यरीत्या पालन करूनच मी निर्णय घेईन, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट असताना विधानसभा अध्यक्षांनी वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले आहे. काय निर्णय घ्यायचा हे ठरविण्यासाठी दिल्लीत जावे लागत असेल, तर मनातील शंकांना बळ मिळते. - खा. संजय राऊत, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 

कागदपत्रे मिळाली नाहीत, या नावाखाली वेळकाढूपणा सुरू असला, तरी आठवडाभरात निर्णय करावाच लागणार आहे. विधान परिषदेच्या ३ आमदारांच्या अपात्रतेबाबतही आम्ही यापूर्वीच याचिका दाखल केली आहे.- अनिल परब, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

Web Title: hearing next week; Shinde will kill Thackeray?; Speaker Rahul Narvekar returned from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.