सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. तर आरोपी राजू पाटील यांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका झाली. मागील शनिवारी (दि. ५) रोजी पनवेल येथील सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान, आज ११ एप्रिल रोजी शिक्षेची सुनावणी झाली. पण, आता न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे.
या प्रकरणी आता २१ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
आजच्या सुनावणीत काय झाले?
आजच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने अश्विनी बिद्रे यांचे पती, मुलगी, वडील, भाऊ यांचे म्हणणे ऐकूण घेतले. त्यांच्यासह मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, त्याचा साथीदार कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांचेही म्हणणे ऐकूण घेतले.
बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरंदकर दोषी, राजू पाटील निर्दोष
सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. तर आरोपी राजू पाटील यांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका झाली.
अभय कुरुंदकरवर अनेक आरोप असताना राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस केली जाते हे भयंकर असून राष्ट्रपती पदक शिफारस करणाऱ्या कमिटीवर न्यायाधीश संतापले. याप्रकरणात महेश प्रनोकार व कुंदन भंडारी यांचा मृतदेहची विल्हेवात लावण्यासाठी सहभागी असल्याचे सिद्ध झाले. मयत अश्विनी बिद्रे-गोरे यांचे पती आनंद गोरे सुनावणीवेळी कोर्टात हजर होते.
खून करुन वसईच्या खाडीत फेकला होता मृतदेह
अश्विनी बिद्रे-गोरे या सहायक पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत हात्या. हातकणंगले तालुक्यातील आळते हे त्यांचे मूळचे गाव. सामान्य घराण्यातून वरिष्ठ पदावर पोहचलेल्या अधिकारी अशी त्यांची ओळख. अश्विनी बिद्रे-गोरे यांचा ११ एप्रिल २०१६ रोजी खून झाला. खून खटल्यात मुख्य संशयित व बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने त्याच्या मीरा रोड येथील घरी अश्विनी बिद्रे-गोरे यांचा अमानुष खून केल्याचा तसेच सहकाऱ्याच्या मदतीने मृतदेहाचे लहान-लहान तुकडे करून वसईच्या खाडीत फेकून दिल्याचा आरोप होता.