ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 12- घरकूल प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळावा, म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर आता १२ आॅगस्ट २०१६ रोजी सुनावणी होणार आहे.सुरेशदादा जैन यांनी दाखल केलेल्या अर्जावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती जगदीशसिंग खेहर व न्यायमूर्ती अरुणकुमार मिश्रा यांच्या पिठासमोर सुनावणी झाली. त्यात, सरकार पक्षाच्यावतीने घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीचा अहवाल (केस स्टेटस् डिटेल्स) न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालाचे अवलोकन केल्यानंतर न्यायालयाने, घरकूल प्रकरणातील उर्वरित साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याचे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्यानंतर सुनावणीअंती सुरेशदादा जैन यांच्या जामिनावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. याप्रकरणी आता पुढील सुनावणी १२ आॅगस्ट रोजी होणार आहे. सुरेशदादा जैन यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.कपिल सिब्बल कामकाज पाहत आहेत.
सुरेशदादा जैन यांच्या जामिनावर १२ आॅगस्टला सुनावणी- सर्वोच्च न्यायालय
By admin | Published: July 12, 2016 5:03 PM