पंढरपूर : विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या मुंबईच्या उल्हासनगर येथील राजूबाई भगवानदास राजानी या महिलेला मंदिरात प्रवेश करताच हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला; मात्र रुग्णालयाकडे नेण्यासाठी वैद्यकीय पथक नसल्यामुळे तसेच वेळेत रुग्णवाहिकाही मिळू शकली नाही त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला आणि प्राण गमवावे लागले.भगवानदास व त्यांच्या कुटुंबीयातील दहा जण आज सोलापूरला आले़ नंतर ते पंढरपुरात आले होते. विठ्ठल मंदिरात सकाळी साडेदहाच्या सुमारास पददर्शनासाठी मोठी गर्दी असल्याने त्यांनी मुखदर्शन घेण्याचे ठरविले, नामदेव पायरी चढून मंदिरात जाताच राजूबाई यांना धाप लागली. यापूर्वी त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांना चालणे शक्य होत नव्हते. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना बाहेर नेऊन सभागृहातील पायरीवरच झोपवले. काही कर्मचाऱ्यांनी रिक्षा आणल्या, पण रिक्षात बसण्यास त्यांनी नकार दिला. अखेर अर्ध्या तासाने व्हॅनमधून खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)अॅम्बुलन्स मिळाली नाहीराजूबाई यांना त्रास व्हायला लागल्यावर मंदिर कर्मचारी नारायण वाघ, प्रमोद आदलिंगे यांनी रिक्षा आणली; मात्र त्यांच्या स्थूलपणामुळे त्यांना रिक्षात नेता आले नाही. मंदिर समितीच्या कंट्रोल रूममधून १०८ या रुग्णवाहिकेला कॉल केला; मात्र दोन्ही रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णांना आणण्यासाठी पंढरपूर शहराबाहेर होत्या. शेवटी करकंबहून एक रुग्णवाहिका रवाना झाली; मात्र तोपर्यंत राजूबाई यांची प्रकृती अतिशय खालावली होती, अखेर मंदिराशेजारील एका व्हॅनमधून त्यांना नेण्यात आले. राजूबाईने केले नेत्रदानराजूबाई यांनी मरणापूर्वीच नेत्रदानाचा संकल्प करून अर्जही भरला होता. दुपारी पार्थिव मुंबईला नेईपर्यंत आठ ते दहा तासांचा अवधी लागणार असल्याने त्यांचे पती भगवानदास यांनी पंढरीतच नेत्रदानाचा निर्णय घेतला. शवविच्छेदनानंतर त्यांचे नेत्र घेण्यात आले.
विठ्ठल मंदिरात महिलेला हृदयविकाराचा धक्का
By admin | Published: June 26, 2016 3:00 AM