नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेळगाव ढगा शिवारात असलेल्य बंधाऱ्यात बुडून एकाच कुटुंबातील मायलेकींसह सूनेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरूवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास धुणीभांडी करण्यासाठी शिंदे कुटुंबातील महिला, मुली येथील बंधा-यावर गेल्या होत्या. त्या दरम्यान, एकमेकींना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघींनाही आपले प्राण गमवावे लागले. शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या हृदयद्रावक घटनेने संपुर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेळगाव ढगा सहावा मैल शिवारातील महालक्ष्मीनगर येथे अरुण शिंदे हे कुटुंबासमवेत राहतात. त्यांच्या पत्नी मनीषा शिंदे (४२), रुतुजा अरुण शिंदे (१६), वृषाली अरुण शिंदे (२१) व अरुण शिंदे यांच्या मोठ्या भावाचा मुलगा नीलेशची पत्नी आरती शिंदे (२१) या चौघी येथील नंदीनी नदीला येऊन मिळणा-या नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधा-यावर धुणीभांडी करायला गेल्या होत्या. यावेळी चौघींपैकी एकीचा पाय घसरुन पाण्यात पडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून एकमेकींना वाचविण्यासाठी एकापाठोपाठ पाण्यात उतरलेल्या या चौघींनाही पाण्याचा अंदाज न आल्याने नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातपूर पोलिसांनी केली आहे. रुतुजा शहरातील व्ही.एन.नाईक महाविद्यालयात वाणिज्य शाखेत इयत्ता ११वीला शिक्षण घेत होती तर वृषाली ही केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान शाखेत पदवीच्या द्वितीय वर्गात शिकत होती. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ढगा गावातील स्थानिक तरुणांनी बंधा-याच्या दिशेने धाव घेतली. तसेच पोलीस व अग्निशामक दलाला माहिती कळविण्यात आली. सातपूर पोलीस ठाण्याचे पथक व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी बंधाºयात उतरुन चौघींनाही पाण्यातून बाहेर काढले होते. चौघींनाही तत्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकिय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले.
हृदयद्रावक : नाशिकमध्ये तलावात बुडून माय-लेकींसह सूनेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 8:14 PM
बेळगाव ढगा सहावा मैल शिवारातील महालक्ष्मीनगर येथे अरुण शिंदे हे कुटुंबासमवेत राहतात. त्यांच्या पत्नी मनीषा शिंदे (४२), रुतुजा अरुण शिंदे (१६), वृषाली अरुण शिंदे (२१) व अरुण शिंदे यांच्या मोठ्या भावाचा मुलगा नीलेशची पत्नी आरती शिंदे (२१) या चौघी येथील नंदीनी नदीला येऊन मिळणा-या नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधा-यावर धुणीभांडी करायला गेल्या होत्या.
ठळक मुद्देनाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली शिंदे कुटुंबातील महिला, मुली धुणीभांडी करण्यासाठी बंधा-यावर गेल्या होत्या