शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

'ए दिल...'ची 4 दिवसांत 121 कोटींची विक्रमी कमाई

By admin | Published: November 01, 2016 4:48 PM

दिग्दर्शक निर्माता करण जोहरचा सिनेमा 'ए दिल है मुश्किल'ने बॉक्सऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 1 - दिग्दर्शक निर्माता करण जोहरचा सिनेमा 'ए दिल है मुश्किल'ने बॉक्सऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. चार दिवसांत सिनेमाने तब्बल 121 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. दिवाळीनंतर हा सिनेमा आणखी कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चित्रपट समिक्षक आणि विश्लेषक तरण आदर्श यांनी 'ए दिल है...'ने केलेल्या कमाईसंदर्भातील माहिती ट्विट करुन दिली आहे.  
 
रिलीजच्या दुस-या दिवशी सिनेमाने जवळपास 13.10 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर दोन दिवसांची मिळून 26.40 कोटी रपये इतका गल्ला या सिनेमाने बॉक्सऑफिसवर जमवला होता. तर आता चार दिवसांत सिनेमाने तब्बल 121 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
 
रिलीजपूर्वीच हा सिनेमा ब-याच चर्चेत होता.  पाकिस्तानी कलाकार फवाद खानचा सहभाग असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सिनेमाला विरोध केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही अटी घालत सिनेमाला केलेला विरोध मागे घेतला. 
 
 
 
'मनसे'ने सिनेमा प्रोड्युसर्स असोसिएशनला घातलेल्या अटी 
'भविष्यात कोणत्याही पाकिस्तानी कलाकार, गायक, तंत्रज्ञ यांना बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळणार नाही हे लिहून द्या, अशी अट दिग्दर्शक- निर्मात्यांपुढे ठेवली व त्यांनी ती मान्य केली', असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. तसेच 'जे निर्माते पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमे बनवत आहेत त्यांनी प्रायश्चित म्हणून प्रत्येकी पाच कोटी रुपये आर्मी वेलफेअर फंडासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे जमा करावेत', अशीही मागणी राज ठाकरे यांनी केली होती. शिवाय 'ए दिल है मुश्किल' सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहणारी पाटी दाखवावी, अशी अटदेखील मनसेने घातली होती.