शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

‘दिल से’ एक्स्प्रेसला समर्थकांच्या शंकेचा ‘ब्रेक’

By admin | Published: October 11, 2015 11:09 PM

शेट्टी-सदाभाऊंमध्ये बेबनावची चर्चा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे समीकरण बदलतंय

अशोक पाटील --इस्लामपूर--राज्यातील ऊस, कांदा आणि कापूस उत्पादकांच्या ताकदीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत लाल दिव्याच्या गाडीसाठी भाजपच्या कोअर कमिटीपुढे वटकण लावून बसले आहेत. त्याचा फैसला अद्याप झाला नसला तरी, शेट्टी व खोत यांच्याजवळील कार्यकर्त्यांचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यात बेबनाव असल्याच्या चर्चेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गोटातच उधाण आले आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी एफआरपी एकरकमी मिळण्यासाठी साखरसम्राटांचा केंद्रबिंदू असलेल्या वाळवा, शिराळ्यात संघर्षाची भाषा सुरू केली आहे. परंतु राजू शेट्टी यांच्या पाठीशी जुन्या व ठराविक कार्यकर्त्यांचाच वावर असल्याचे दिसते. यामध्ये प्रामुख्याने राम पाटील, अनिल पाटील (शिराळा), आप्पा पाटील (इस्लामपूर), शहाजी पाटील (ताकारी), शहाजी पाटील, गणेश शेवाळे (बहे), मधुकर डिसले (किल्ले मच्छिंद्रगड), गुंडाभाऊ आवटी (तांबवे), अशोक सलगर (खरातवाडी), अ‍ॅड. युनूस संदे (पेठ) आदीसारख्या जुन्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच सदाभाऊ यांना राज्यात लाल दिव्याची गाडी मिळणार, या स्वार्थापोटी काही नवीन कार्यकर्ते खोत यांच्याभोवती वावरताना दिसत आहेत. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांत मोठी नाराजी आहे. सध्या सदाभाऊ खोत यांच्याभोवती काही ठराविक कार्यकर्त्यांचाच लवाजमा दिसत आहे. सचिन पवार (रेठरे हरणाक्ष), भास्कर कदम (मसुचीवाडी), भागवत जाधव (नवेखेड) यांचा समावेश असून, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी मात्र दोन्ही नेत्यांना समान अंतरावर ठेवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांत शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये बेबनाव असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचे पानिपत करण्यासाठी एकास एक उमेदवार देण्यासाठी निश्चय केला होता. परंतु हा हेतू सफल न होता, संघटनेतीलच बी. जे. पाटील यांनी स्वाभिमानी पक्ष सोडून मोठा हादरा दिला. तसेच कॉँग्रेसचे माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील हेही या संघटनेत सामील झाले होते. परंतु त्यांनी अपक्ष अर्ज भरून एकास एक उमेदवारीचा फज्जा उडविला. त्यामुळे जयंत पाटील एकाकी निवडून आले. तेव्हापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी काळात या सर्वच कार्यकर्त्यांना राजू शेट्टी यांनी सावरले नाही, तर स्वाभिमानी संघटनेला उतरती कळा लागेल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वाभिमानी संघटना सध्या सरकारबरोबर आहे. राजू शेट्टी आणि खोत यांनी शासनदरबारी बसून ऊस उत्पादकांचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. आंदोलन करून हा प्रश्न सुटणार नाही. सरकारवर दबाव आणला पाहिजे. जयंत पाटील यांना ऊस उत्पादकांबद्दल प्रेम नाही, तर त्यांच्या कारखान्याच्या को-जनरेशनचे काम पूर्ण होण्यासाठी कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी एफआरपी एकरकमी देण्यासाठी दोन महिने साखर कारखाने बंद ठेवण्याची भाषा केली आहे. हा फक्त बनाव आहे. - अभिजित पाटील, माजी जि. प. सदस्य