शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हृदय मुंबईला, यकृत पुण्याला, किडनी औरंगाबादला, नेत्र नांदेडला

By admin | Published: October 19, 2016 7:29 PM

अपघाती मृत्यूनंतर तरुण अधिकारी सुधीर रावळकर यांचे हृदय मुंबईला, यकृत पुण्याला, किडनी औरंगाबादला तर नेत्रदान नांदेडला असा अवयवदानाचा अद्भुत प्रवास सहा जणांचे

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 19 - अपघाती मृत्यूनंतर तरुण अधिकारी सुधीर रावळकर यांचे हृदय मुंबईला, यकृत पुण्याला, किडनी औरंगाबादला तर नेत्रदान नांदेडला असा अवयवदानाचा अद्भुत प्रवास सहा जणांचे आयुष्य फुलविणारा ठरला. एका विमानाने हृदय मुंबईला पोहोचले, दुसऱ्या विमानाने यकृत, पुण्याला तर रुग्णवाहिकेने किडन्या औरंगाबादला नेण्यात आल्या. तसेच दोन्ही नेत्रांचे दान नांदेडमध्ये करण्यात आले. गायक, कवी मनाचे, हसतमुख असणारे सुधीर रावळकर (वय ३६) यांनी पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. ते आकाशवाणीवर निवेदकही होते़ मुखेड येथे रोजगार हमी योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करीत होते. दरम्यान, १७ आॅक्टोबर रोजी नरसी ते मुखेड या रस्त्यावर खंडगाव-बेंद्री येथे सुधीर यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच १८ आॅक्टोबर रोजी रात्री ११़३० वाजता डॉक्टरांनी ब्रेन डेथ असल्याचे घोषित केले. त्यानंतर सुधीर यांची पत्नी तिलोत्तमा, बहीण चंदा रावळकर यांच्यासह रावळकर कुटुंबियांनी मोठ्या धीराने कुटुंबावर कोसळलेले संकट पेलताना इतरांचे आयुष्य फुलविण्याचा विचार मांडला़ अवयवदानाची इच्छा व्यक्त केली़. विशेषत: सुधीर यांची पत्नी तिलोत्तमा यांनी सहा वर्षांच्या मुलीला कवटाळून घेत आपल्या पतीच्या स्मृती जागविल्या़ संवेदनशील मन, कवी, गायक, निवेदक आणि दुसऱ्यांसाठी सतत हसतमुख राहणाऱ्या सुधीर यांचे जगणे जसे समोरच्यांना खुलविणारे होते, तसे त्यांचे जाणेही काहींचे आयुष्य फुलविणारे ठरावे, ही भावना व्यक्त केली़ त्यावेळी उपस्थित नातेवाईक, मित्र, आप्तेष्टांसह डॉक्टरांचेही डोळे पाणावले.१८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता रावळकर कुटुंबियांकडून अवयवदानाला संमती मिळताच डॉ़. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पथक कामाला लागले. त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास पहाटेचे २ वाजले होते़ रात्रभर तब्बल २० डॉक्टरांचे पथक थांबून होते. सकाळी ७ वाजता मुंबई येथील फोर्टिज रुग्णालयातून विमान पाठविण्याबाबत विचारणा झाली़ क्षणाचाही विलंब न करता त्यांना होकार देण्यात आला. तसेच पुणे येथील रुबी हॉस्पिटल, औरंगाबाद येथील कमलनयन बजाज व एमजीएम हॉस्पिटलला संपर्क साधण्यात आला. सकाळीच ग्रीन कॉरीडोअरची माहिती प्रशासनाला देण्यात आली़ जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाकडून मंजुरीही मिळाली. त्यानंतर सकाळी ११़३० च्या सुमारास नांदेड विमानतळावर मुंबईला जाणारे विमान येवून थांबले होते. दुपारी या विमानातून आलेल्या मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजून २२ मिनिटांनी विष्णूपुरी येथील रुग्णालयातून हृदय घेवून वाहनांचा ताफा २० किलोमीटरचे अंतर पार करत १३ व्या मिनिटाला नांदेड विमानतळावर पोहोचले होते. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत हृदय घेवून विमान आकाशात झेपावले. त्यानंतर अर्ध्या तासाने रुग्णालयातून लिव्हर घेवून पुन्हा त्याच मार्गाने वाहनांचा ताफा विमानतळावर पोहोचला़ तोपर्यंत पुण्याकडे जाणारे विमान सज्ज होते. दुपारी ३़३० वाजता रुग्णवाहिकेतून दोन्ही किडन्या औरंगाबादला पाठविण्यात आल्या.मुंबई, पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक हृदय घेवून जाण्यासाठी मुंबईतील फोर्टिज हॉस्पिटलचे हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ.अन्वय मुळे, डॉ़.विजय शेट्टी, डॉ़.संदीप सिन्हा तर यकृत घेवून जाण्यासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलचे डॉ.कमलेश बोकील, मुत्रपिंड घेवून जाण्यासाठी डॉ.क़मलनयन बजाज हॉस्पिटलचे डॉ़. अजय ओस्वाल, डॉ़. भूषण दोडीया, एमजीएम हॉस्पिटलचे डॉ़. प्रशांत दरक नांदेडमध्ये दाखल झाले होते. तसेच नांदेड येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. क़ाननबाला येळीकर, डॉ़. पी़टी़ जमदाडे, डॉ़. राजेश अंबुलगेकर, डॉ़. श्रीधर यन्न्नावार, डॉ़. नितीन नंदनवनकर, डॉ़. डी़पी़भुरके, डॉ़. एच़व्ही़ गोडबोले, डॉ़. अनिल देगावकर यांनी नांदेड येथील अवयवदान प्रक्रियेत मोलाची कामगिरी बजावली़ तसेच नांदेड शहरातील मेंदूविकार तज्ज्ञ डॉ़. ऋतूराज जाधव यांनीही योगदान दिले़ हृदयाचे ठोके... दोनवेळा धोके़...विमानतळाकडे निघालेली हृदयवाहिका वेगात होती़ वर्कशॉप कॉर्नर येथे अचानक आलेल्या गायीमुळे काहीसा अडथळा निर्माण झाला़, परंतु चालकाच्या कौशल्याने ही वाहिका विनाविलंब पुढे निघून गेली़ तेथून चैतन्यनगर शिवमंदिराजवळही रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्याला चुकवत असताना वाहने एकमेकांवर आदळण्याच्या बेतात असतानाच पुन्हा एकदा चालकाचे कौशल्य कामी आले.हृदयद्रावक प्रसंगएकीकडे अवयवदान व प्रत्यारोपणासाठी अधिकारी-कर्मचारी रात्रीपासून प्रयत्नशील होते़ तर दुसरीकडे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी ग्रीन कॉरीडोअरसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय येनपुरे, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे, महेंद्र पंडित, उपअधीक्षक अशोक बनकर यांच्याशी समन्वय साधला़ विमानतळापर्यंत पोलिस निरीक्षक गजानन सैदाने, वाहतूक निरीक्षक राजा टेहरे, निरीक्षक नारनवरे यांनी प्रयत्न केले. शेवटी विमानतळावरील धावपट्टीपर्यंत हृदयवाहिका सुखरूप पोहोचली़ काही क्षणात विमानाने उड्डाण केले. नांदेडसारख्या ठिकाणी अवयवदानाचा प्रयोग यशस्वी झाला़ त्याचवेळी जिल्हा प्रशासनाशी निगडित असणारा एक उमदा सहकारी गमावल्याची खिन्नता अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दिसत होती़.