शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..."
3
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
4
Stock Market Highlights: शेअर बाजारात आजही घसरण; Nifty २३,९०० च्या खाली, सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये
5
'तुमची ताकद किती समजून जाईल'; गणेश नाईकांसमोरच फडणवीसांचं संदीप नाईकांना सूचक इशारा
6
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
7
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
8
NTPC Green IPO च्या प्राईज बँड आणि तारखेची माहिती आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
9
'यारिया' फेम सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चढला बोहल्यावर, दिल्लीतील मंदिरात केलं थाटामाटात लग्न
10
Maharashtra Election 2024 Live Updates: राज ठाकरे यांची आज वरळीत दुसरी जाहीर सभा, कोणावर साधणार निशाणा?
11
मुक्ता बर्वे कलर्स मराठीवरील 'या' मालिकेत साकारणार आगळीवेगळी भूमिका; प्रोमो बघाच
12
LIC नं Tata Group मधील 'या' कंपनीतील हिस्सा विकला, शेअर जोरदार आपटला
13
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
14
सलमान खानला पाठवले धमकीचे मेसेज! पोलिसांनी युवा गीतकाराला ठोकल्या बेड्या; समोर आलं मोठं कारण
15
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
16
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
17
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
18
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
19
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
20
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात

हृदयदावक! बळीराजानं औताला जुंपलं नातू आणि मुलाला

By admin | Published: June 25, 2017 7:16 AM

शेतकामासाठी बैजजोडी नसल्याने एका शेतक-यावर स्वत:च्या मुलाला आणि नातवाला औताला जुंपण्याची वेळ आल्याची

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 25 - राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यानंतर बळीराजाने शेतीच्या मशागतीचं काम सुरु केलं आहे. शेतकामासाठी बैजजोडी नसल्याने जळगावात एका शेतक-यावर स्वत:च्या मुलाला आणि नातवाला औताला जुंपण्याची वेळ आल्याची धक्कादायक आणि हृदयदावक घटना समोर आली आहे. गरीबीमुळे बैलजोडी खरेदी करणे आणि पाळणे त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे शेत जमिनीच्या मशागतीची कामं त्यांचा मुलगा आणि नातू करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने अनेकांचे काळीज पिळवटळे आहे. त्यामुळे सरकारनं काल कर्जमाफी केली असली तरी त्यातून शेतकऱ्यांचा प्रश्न खरचं सुटला का असा प्रश्न उभा राहतोय. जळगावजिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील निंभोरा गावातील हिरामण पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्यावर आपल्या नातवाला आणि मुलाला औताला जुंपण्याची वेळ आली आहे. या तिघांचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरामण पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित असलेल्या दीड एकर शेती आहे. त्यांनी यावर्षी कापसाची लागवड केली आहे. मात्र अल्पभूधारक खातेदार असल्याने त्यांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नाही. परिणामी मशागतीसाठी लागणारी बैलजोडी पाळणे त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे हिरामण स्वतःच्या काळजावर दगड ठेवून बैलांऐवजी मुलगा आणि नातवंडाला औताला जुंपून शेतीच्या मशागतीची कामे करत आहेत. एवढेच नव्हे तर इतर शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करून पाटील कुटुंब घरची शेती कसतात.दरम्यान, कर्जाला आणि सततच्या नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी सध्या आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना दिसत आहे. परंतू असे असताना पाटील मात्र जगण्यासाठी शेतीत घाम गाळत आहे. त्यांची ही बाब कौतुकास्पद असल्याने त्याची नोंद ठेवणे गरजेचे आहे.