पुणे/नागपूर/अकोला : उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र पुन्हा एकदा होरपळून निघाला आहे. विदर्भाला सर्वाधिक झळ बसली असून मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र भाजून निघाला आहे. गुरुवारी राज्यातील सर्वाधिक तापमान विदर्भातील अकोला येथे ४६़३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. रात्रीच्या किमान तापमानातही राज्यात सर्वत्र वाढ झाली आहे.
पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भात काही ठिकाणी तसेच ओडिशा, दक्षिण उत्तर प्रदेश, दक्षिण राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात येथे अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे़ त्यात पुढील काही दिवसात वाढ होण्याची शक्यताअसून उष्णतेची ही लाट पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ४१़६ (२५़१), अहमदनगर ४३़४ (२३़६), जळगाव ४३ (२७़६), कोल्हापूर ४०़७ (२६़१), महाबळेश्वर ३३़४ (२२़४), मालेगाव ४२़६ (२६़८), नाशिक ४०़५ (२३़६), सांगली ४१़२(२३़९), सातारा ४०़४(२६), सोलापूर ४२़८ (२७़२), मुंबई ३२़५ (२६़८), अलिबाग ३१़८(२५़५), रत्नागिरी ३३़६ (२५़८), पणजी ३४़४ (२५़६), उस्मानाबाद ४२़१, औरंगाबाद ४२़५ (२४़७), परभणी ४५ (२२़५), अमरावती ४०़५(२३़२), बुलढाणा ४२़५ (२७़२), चंद्रपूर ४५़४ (२९), गोंदिया ३९़८ (२४़२), नागपूर ४४़३ (२७़४), वाशिम ४३़८ (२८), वर्धा ), यवतमाळ ४४़५ (२९़४)
विदर्भात ऑरेंज अलर्ट जारीविदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील तापमान प्रचंड वाढले असून हवमान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुढील तीन दिवस नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये उष्ण हवेचे वारे वाहणार असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेव्हा तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच डिग्री सेल्सिअसच्या वर जाते तेव्हा कडक उन आरोग्याला घातक ठरू शकते. अशा परिस्थितीमध्ये हवामान विभाग ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करीत असतो.
अकोल्याचे तापमान जगात तिसऱ्या क्रमांकावरअकोल्याचे गुरुवारचे ४६.३ अंश सेल्सिअस तापमान जगात तिसºया क्रमांकावर होते. मध्यप्रदेशातील खरगोन येथे ४६.५, म्यानमारमधील चौक येथे ४६.४ त्यानंतर तिसºया क्रमाकांवर अकोल्याचे तापमान नोंदविले गेले.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे़ या चक्रीवादळामुळे तमिळनाडू किनारपट्टीचा भाग, केरळ, आंध्रच्या द. किनाºयावर २८एप्रिल ते १ मे दरम्यान अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.