नागपूरचा उन्हाळा तसा प्रसिद्धच आहे. मात्र गेल्या काही वर्षांंंंंपासून उन्हाळा जाणवू लागला आहे. तापमान फारसे वाढले नसले तरी, गरमी प्रचंड वाढली आहे. अंग भाजणार्या उन्हामुळे सकाळी ९ वाजतापासून बाहेर पडणे कठीण झाले आहे. कूलर, एसीशिवाय घरात राहणेसुद्धा कठीण आहे. उन्हाळ्यात नागपूर पेटून राहिले की काय, असा भास होतोय. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नागपूरच्या तापमान वाढीच्या कारणावर टाकलेला दृष्टिक्षेप.२५0 वर्षांंंंंपूर्वी हवेतील कार्बनचे प्रमाण २८0 पीपीएम होते. १२ मे २0१३ रोजी जागतिक पर्यावरण तज्ज्ञांनी घेतलेल्या नोंदीत कार्बनचे प्रमाण ४00 पीपीएम एवढे आढळले. हा आकडा ४२0 पीपीएमवर गेल्यास, पृथ्वीवरील जीवसृष्टीस नुकसान होऊ शकते. वातावरणात दरवर्षाला २ पीपीएम कार्बनचे प्रमाण वाढते आहे. ४२0 पीपीएम पर्यंंंंंत पोहचण्यासाठी केवळ १0 वर्षेआहेत. कार्बनच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान २ डीग्रीने वाढले आहे. गेल्या काही वर्षात नागपूरचा उन्हाळा असह्य होत आहे. नागपुरात तापमानाबरोबर गर्मीही प्रचंड वाढली आहे. नासाच्या २0११-१२ च्या अहवालात महाराष्ट्रात नागपूर व चंद्रपूर या दोन शहरातील वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली असल्याचा उल्लेख आहे.
नागपूर का तापतेय ?
By admin | Published: June 05, 2014 1:09 AM