शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट

By admin | Published: April 17, 2017 3:03 AM

कोकण वगळता राज्यभरात उष्णतेची लाट आली आहे़ मार्च महिन्यात पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे देशभरात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत

पुणे : कोकण वगळता राज्यभरात उष्णतेची लाट आली आहे़ मार्च महिन्यात पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे देशभरात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत असे़ पण, यंदा मान्सूनपूर्व पावसात ११ टक्के घट झाल्याने देशभरातच उष्णतेत वाढ झाली आहे़राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४५़९ आणि चंद्रपूर येथे ४५़८ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १९़९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़देशभरात १ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान सरासरी ४९़२ मिमी पावसाची नोंद होते़ यंदा मात्र केवळ ४४़३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ ११ टक्के पाऊस कमी झाला आहे़ यावर्षी १२ एप्रिलपर्यंत कोकणात सरासरी ०़६ मिमी पावसाची नोंद होत असते़ यंदा अजिबात पाऊस झाला नाही़ मध्य महाराष्ट्रात ५़५ मिमी पाऊस होतो़ यंदा १़२ मिमी पावसाची नोंद झाली़ सरासरीपेक्षा ७९ टक्के कमी पाऊस झाला़ मराठवाड्यात ८़४ मिमी सरासरीच्या तुलनेत ४़७ मिमी पाऊस झाला असून तो ४३ टक्के कमी आहे़ विदर्भात १५़४ मिमीच्या तुलनेत केवळ ६़१ मिमी पाऊस झाला असून तो ६० टक्के कमी आहे़ मान्सूनपूर्व पावसाचा अभाव तसेच आकाशात ढगांचा अभाव असल्याने सूर्याची प्रखरता वाढलेली आहे़ त्यात वाळवंटी प्रदेशातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांची तीव्रताही खूप वाढल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व अन्य ठिकाणच्या कमाल तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे़ पश्चिम राजस्थानमधील बऱ्याच ठिकाणी तसेच पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पूर्व राजस्थान येथेही उष्णतेची लाट आली आहे़ हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, सौराष्ट्र, कच्छ येथील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे़ (प्रतिनिधी)पुणे ४०़७, अहमदनगर ४३़२, जळगाव ४४़५, कोल्हापूर ३६़४़, महाबळेश्वर ३३़९, मालेगाव ४२़६, नाशिक ४०़, सांगली ४०़, सातारा ४०़९, सोलापूर ४३़१, मुंबई ३४़२, अलिबाग ३३़९, रत्नागिरी ३२़४, पणजी ३४, डहाणु ३५, औरंगाबाद ४१़४, परभणी ४४़२, नांदेड ४४़५, बीड ४३़२, अकोला ४५, अमरावती ४३़८, बुलढाणा ४१, ब्रम्हपुरी ४५़९, चंद्रपूर ४५़८, गोंदिया ४४़२, नागपूर ४५, वर्धा ४५, यवतमाळ ४३़५ (अंश सेल्सिअस)