पुणे : उत्तरेतील वाऱ्यांनी राज्यात सर्वत्र उन्हाचा प्रचंड कडाका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने सन २०१७ च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. याचे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे शासनाने राज्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. याबाबत राज्याच्या आपत्ती निवारण विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले आहे.भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या उन्हाळ्यात संपूर्ण राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक राहणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी उन्हाळ्याची सुरुवातदेखील लवकर झाली आहे. यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा स्तरावरील आपत्ती कक्ष व सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच उष्णतेच्या लाटेपासून बचावकार्य करण्यासाठी नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शक सूचनादेखील दिल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना स्थानिक स्तरावर विविध प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि रेडिओद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास देखील सांगण्यात आले आहे.>उष्णतेपासून बचाव करण्यासाठी हे करावेजास्तीत जास्त पाणी पिणे, जागोजागी पाणपोईची सुविधा करावीहलके, पातळ, सुती कपडे वापरावेत, गॉगल्स, छत्री, टोपीचा वापर कराउन्हात काम करताना ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावाअशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी,सतत घाम आल्यास उन्हाचा झटका बसण्याची लक्षणे, चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणेपहाटेच्या वेळी जास्तीत जास्त काम करून दुपारी आराम करागरोदर महिलांनी अधिक काळजी घ्यावीकाय करू नयेलहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नयेदुपरी १२.३० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावेगडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळा, उन्हात श्रमाची कामे टाळा
राज्यात यंदा उष्णतेची लाट
By admin | Published: March 07, 2017 1:02 AM