लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून, सोमवारी अकोल्याचे तापमान ४६ .० अंशावर पोहाचले. मागील चोवीस तासात ब्रह्मपुरीचे तापमान ४६.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत होते. दरम्यान, येत्या ७२ तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, विदर्भात येत्या चोवीस तासात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.संपलेल्या चोवीस तासात कोकण-गोवा मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तर कोकण-गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.विदर्भात येत्या आठ दिवस तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरी ४४ ते ४५ अंश राहण्याची शक्यता आहे.
विदर्भात उष्णतेची लाट!
By admin | Published: May 16, 2017 1:31 AM