ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 6 - राजेंद्र भिरूड या शेतक-याचा बुधवारी संध्याकाळी उष्माघातानं मृत्यू झाला. ते पाडसळे येथील रहिवासी होते. दरम्यान, उष्माघाताचा हा जिल्ह्यातला दुसरा बळी आहे. मूळचे शिरसाड येथील रहिवासी असलेले भिरूड हे गेल्या 20वर्षांपासून व्यवसायानिमित्त पाडळसे, तायावल येथे स्थायिक झाले होते.
बुधवारी दुपारी ते शेतात कडब्याचा चारा बांधत असताना त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला. यानंतर संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पाडळसे येथील स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आलं. या डॉक्टरांनी त्यांना तातडीने भुसावळ येथे हलवण्याची सूचना केली.
दरम्यान, भुसावळ येथे नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळेच शेतक-याचा मृत्यू झाला असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. गुरुवारी सकाळी मूळ गावी शिरसाड येथे भिरुडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आणखी बातम्या