मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील ७२ तासांसाठी पूर्व आणि मध्य भारतासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे; तर मुंबईत मात्र पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.मुंबईतील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २५ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. स्कायमेटच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. परिणामी येत्या ४८ तासांत कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्र या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील. तसेच विदर्भात पुढील २ ते ३ दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. सर्वात कमी पाऊस झालेल्या मराठवाड्यात येत्या ४८ तासांत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसाचा इशारा
By admin | Published: August 27, 2015 3:20 AM