-प्रकाश बेळगोजी
बेळगाव - गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. याशिवाय बेळगाव जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून, जिल्ह्यातील सात नद्यांतून पाण्याची आवक वाढली आहे, ही आनंदाची बाब आहे. घटप्रभा नदीतून 25765 क्युसेक, मार्कंडेय नदीतून 1454 क्युसेक, हिप्परगी बॅरेजमधून 91200 क्युसेकची आवक व तेवढ्याच प्रमाणात पाणी वाहत आहे.
आलमट्टी धरणाची आवक ८,३९४५ असून ६४,२०१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण १५ पूल पाण्याखाली गेले असून या पुलांपासून अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक पर्यायी मार्गाने जोडण्यात आली आहे.भोजवडी कन्नूर, धुडगंगा नदीवर बांधलेला कारदगा भोज पूल, दूध गंगा नदीवर बांधलेला जत्राट भिवशी पूल, वेदगंगा नदीवर बांधलेला कन्नूर बरवडा अकोला-सिडना पूल, वेदगंगा नदीवर बांधलेला हुन्नरगी-ममदापूर पूल, चिकोडी तालुक्यातील मलिकवाड दत्तवाड पुल वेदगंगा नदीवर बांधलेला पूल.
हिरण्यकेशी नदीवरील उराणी कोचरी जोडणारा पूल, कृष्णा नदीवरील मांजरी भवनसौंदत्ती पूल, हालात्री धरण ओलांडून खानापुरा हेमडगा पूल, कृष्णा नदीवरील मंगळवती राजापूर पूल, वेदगंगा नदीवरील भोजवडी निप्पाणी पूल आणि घटप्रभा नदी, शेट्टीहल्ली मरनहोळ मार्गावरील एकूण 15 पूल पाण्याखाली गेले असून 15 पुलावरून जाणारी रहदारी पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे .जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी नदीच्या पात्रात न जाण्याचा इशारा दिला असून, सर्व बुडीत पुलांवर बॅरिकेड्स लावण्यात आले असून हे पूल ओलांडू नयेत यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.