पुणे : अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने कोकण आणि विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. अलिबामध्ये १३० मि़मी़, कुरखेडा येथे ११०, आरमोरी येथे १००, माथेरान, रोहा, सावंतवाडी, ब्रम्हपुरी, चिमूर येथे ५०, अर्जुनी (मोरगाव), देसाईगंज येथे ४०, गुहागर, पेण, फोंडा, तळा, वेंगुर्ला, कोर्ची, पवनी, साकोली, महाबळेश्वर, नेवासा येथे ३०, कर्जत, खालापूर, कुडाळ, महाड, मुंबई, मुरूड, पनवेल, पोलादपूर, राजापूर, शहापूर, ठाणे, येथे २०, अंबरनाथ, भिरा, भिवंडी, चिपळूण, दापोली, देवगड, हर्णे, कणकवली, मालवण, श्रीवर्धन, उल्हासनगर, चंदगड, गगनबावडा, इगतपुरी, चामोर्शी, हिंगणघाट, नागपूर येथे १० मि़मी़ पाऊस पडल्याची नोंद झाली.
कोकण, विदर्भात मुसळधार पाऊस
By admin | Published: August 29, 2015 2:21 AM