डहाणू/बोर्डी : डहाणू तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून, या हंगामात आतापर्यंत एकूण ५४०.७ मिमी पावसाची नोंद झाली आली आहे. दरम्यान, रविवार, २६ जून रोजी तालुक्यात सर्वाधिक २५१ मिमी पाऊस झाला असून, गेल्या दहा वर्षातील हा उच्चांक आहे. सोमवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भात पेरणीच्या कामाने वेग घेतला. मात्र गेले काही दिवस पावसाची संततधार कायम असल्यामुळे तलाव, बंधारे आणि पाणथळ जमिनीवर पावसाचे पाणी साचले. भात पेरणी केलेली खाचरे पाण्याखाली गेल्याने शिवाय, येत्या काही दिवसात पाण्याचा जोर असाच कायम राहिल्यास पेरलेले बियाणे कुजून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांना सातावू लागले आहे. २६ जून २००२ साली डहाणू तालुक्याला पुराने झोडपले होते. त्यावेळी पुराने थैमान घातल्याने ठिकठिकाणी नागरिक अडकले होते. डहाणू शहरात अनेक इमारतींमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांपासून सर्वांचेच नुकसान झाले होते. शासकीय कार्यालयातील कागदपत्रेही भिजली होती. (वार्ताहर)>जव्हारमध्ये धुवाँधार : गेल्या काही दिवसां पासुन रिमझिम बरसणाऱ्या पावसाने शुक्रवार पासुन धुवाँधार सुरवात केलेली असुन सोमवार पर्यत जोरदार पडणाऱ्या धो-धो पावसाने जव्हार शहराला चांगलेच झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने थोडाही वेळ उघडीप दिलेली नसल्यामुळे नागरीक कंटाळून घराबाहेरही निघालेले नाहीत. रस्त्यांवर ओस पडलेले चित्र दिसत आहे.पावसामुळे भक्कम बांधलेले स्लॅबची घरेही गळायला लागली आहेत. खेडोपाड्यातून येण्या जाण्याऱ्या रस्त्यांवरपाणी साचल्याने काही खेडोपाड्यांचा संपर्क तुटला आहे.
डहाणूत पावसाने दहा वर्षांचा विक्रम मोडला
By admin | Published: June 28, 2016 3:04 AM