शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता, कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 12:35 AM

पालघर, ठाणे, मुंबईत २ ते ४ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता

ठळक मुद्देपालघर, ठाणे, मुंबईत २ ते ४ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता

पुणे : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.गेल्या २४ तासात कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गुहागर १५०, कुडाळ १२०, रत्नागिरी ११०, मुंबई (कुलाबा) १००, चिपळूण, दोडामार्ग, मालवण ८०, म्हापसा, मुरुड ७०, उरण, वाल्पोई ६०, हर्णे, राजापूर, सावंतवाडी, वेंगुर्ला ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय बºयाच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात विटा ११०, दौंड, मालेगाव, बागलाण ७०, गगनबावडा, त्र्यंबकेश्वर ६०, करमाळा, खेड, राजगुरुनगर, ओझर, पुणे, शाहूवाडी ५०, कळवण, तळोदा ४० मिमी पावसाची नोंंद झाली होती. मराठवाड्यात अंबड १०, आष्टी, केज, वाशी ६०, अंबेजोगाई, भूम, घनसावगी, हिंगोली, लोहा, परतूर ४०, औरंगाबाद, औसा, जाफराबाद, पैठण, सेनगाव, सोयेगाव ३० मिमी पाऊस पडला़ विदर्भात नांदगाव, काजी ५०, देऊळगाव राजा, लाखंदूर, मनोरा, वरोरा ४०, बुलढाणा, चिखली, देसाईगंज, सिंधखेड राजा ३० मिमी पाऊस झाला.घाटमाथ्यावर धारावी ९०, ताम्हिणी ७०, डुंगरवाडी, दावडी, भिरा ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.मंगळवार दिवसभरात महाबळेश्वर येथे ३५, कोल्हापूर ६, पणजी ६ मिमी पाऊस झाला आहे.१ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.............कोकणातील रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २, ३ व ४ जुलै रोजी जोरदार ते अतिजोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ३ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबईत २ ते ४ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात ३ व ४ जुलै रोजी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानMonsoon Specialमानसून स्पेशल