पुणे : मध्य प्रदेशापासून राजस्थानपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या पश्चिम भारतात बºयाच भागात पाऊस पडत आहे़. गेल्या २४ तासात कोकण काही ठिकाणी अतिवृष्टी झाली़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. मराठवाड्यात येत्या १९ सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़. देशात सध्या मॉन्सून पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात सक्रीय आहे़. कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़ खालापूर, उल्हासनगर ६०, कर्जत, सुधागड पाली ५० मिमी पाऊस झाला़ याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, हरसुल, महाबळेश्वर ५०, इगतपुरी, ओझर, ओझरखेडत्त, पन्हाळा, राधानगरी, साक्री, वडगाव मावळ ३० मिमी पाऊस पडला़ मराठवाड्यात बीड, निलंगा ३०, चाकूर, लोहारा, वडावणी २०, अंबड, गंगाखेड, हिमायतनगर, कन्नड, खुल्दाबाद, परळी वैजनाथ, सेनगाव १० मिमी पाऊस पडला़. विदर्भात चिखलदरा २०, धारणी, मुलचेरा १० मिमी पावसाची नोंद झाली होती़. रविवारी दिवसभरात महाबळेश्वर १७, मुंबई १०, अलिबाग २४, पणजी १३, डहाणु ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे़.
येत्या २४ तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. इशारा : १६ व १७ सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता़ १८ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ़़़़़पुणे शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून अधून मधून सरी येत असतात़. पुढील पाच दिवस शहरात मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे़. ़़़़़़गेल्या २४ तासात झालेला पाऊस पालघर २४०, भिवंडी १५०, डहाणु, माथेरान १४०, दावडी ११०, तलासरी, वसई, डुंगरवाडी, भिवपुरी १००, भिरा, ताम्हिणी ९०, कल्याण, शिरगाव ८०, अंबरनाथ, म्हसळा, विक्रमगड, पेठ, वळवण ७० मिमी पावसाची नोंद झाली होती़. ़़़़़़़़पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात १६, १७ व १८ सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे़. १९ सप्टेंबरला पालघर, रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात १९ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे़. मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी १९ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.