मुंबई- सलग तीन दिवस सुट्या आल्याने लाँग विकेण्ड एन्जॉय करण्यासाठी पर्यटक सहलीला निघाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळणार आहे. तसंच खालापूर टोल नाक्यावर मोठी गर्दी झाली आहे.
पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक ते दोन किलोमीटर वाहनांची रांगा असून पुण्याकडे जाण्यासाठी अधिकच्या सहा लेन सुरु करण्यात आल्या आहेत. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्याकडे जाण्यासाठी अधिकच्या सहा लेन सुरु करण्यात आल्या आहेत.
आज प्रजासत्ताक दिन, उद्या चौथा शनिवार आणि परवा रविवारची सुट्टी मुंबईबाहेर जाणाऱ्या मार्गावर मोठी कोंडी झाली आहे. जुना मुंबई-पुणे महामार्गावर शेडुंग टोलनजीक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.