नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याची उंची २५ फूट कमी करण्यात आल्याच्या आरोपावरून व भाजपाचे अतुल भातखळकर यांच्या विधानावरून मंगळवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. अतुल भातखळकर यांनी अखेर माफी मागितल्यानंतर कामकाज सुरू झाले. पुतळ्याची उंची कमी केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा विषय उपस्थित केला होता. त्यावर भाजपाचे भातखळकर यांनी, ‘मूळ मुद्द्यांवर चर्चा न करता हे दिशाभूल करणारे आहे, कामाचे विषय सोडून ते भलते विषय काढतात,’ असे विधान केले.
शिवरायांच्या पुतळ्याची उंची कायमच : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 6:41 AM