शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

हॅलिकॉप्टरचा निर्माता औद्योगिकनगरीच्या आश्रयाला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 2:21 PM

प्रदीपने शालेय शिक्षण सोडल्यानंतर अभियांत्रिकीची आवड असल्याने जीप, ट्रॅक्टर, मोटार दुरूस्ती करण्याचे गॅरेज सुरु केले. ते करत असतानाच त्याने संपूर्ण भारतीय बनावटीचे हॅलिकॉप्टर तयार करण्याचा निर्धार केला.

ठळक मुद्देसंशोधनासाठी हवे आर्थिक पाठबळ पहिल्या हॅलिकॉप्टरचे वजन ७०० किग्रॅ आणि आता बनविलेल्या हॅलिकॉप्टरचे वजन २५० किग्रॅ ड्रोन, फ्लाइंग कार तसेच भारतीय सैन्यासाठी सुरक्षित कम्वो हॅलिकॉप्टर बनविण्याची जिद्दप्रदीपने आतापर्यंत जवळपास बनविले ७ हॅलिकॉप्टर येणाऱ्या पैशाचा हॅलिकॉप्टरच्या संशोधनासाठी वापर करावा हा उद्देश

पिंपरी : तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकानजीक असलेल्या मोटार गॅरेजमध्ये उभे असलेले एक हॅलिकॉप्टर जाणाऱ्या  येणाऱ्या प्रवाशांचे चटकन लक्ष वेधून घेत आहे. कित्येक जिज्ञासू प्रवासी त्या गॅरेजमध्ये जात हॅलिकॉप्टर निरखून पाहत आहेत. हे हॅलिकॉप्टर खरे की खोटे, ते उडणारे आहे की धावणारे, कसे उडते ..? असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधचा प्रयत्न प्रवासी करत आहेत. जेमतेम दहावीपर्यंत शिकलेल्या सांगली येथील प्रदीप मोहिते निर्मित हॅलिकॉप्टरची ही गोष्ट .... 

  प्रदीपने शालेय शिक्षण सोडल्यानंतर अभियांत्रिकीची आवड असल्याने जीप, ट्रॅक्टर, मोटार दुरूस्ती करण्याचे गॅरेज सुरु केले. ते करत असतानाच त्याने संपूर्ण भारतीय बनावटीचे हॅलिकॉप्टर तयार करण्याचा निर्धार केला. प्रदीप मोहिते मूळचा वांगी ता.कडेगाव,त्यासाठी तन, मन, धन लावून हॅलिकॉप्टर बनविले आणि ते उडविले सुद्धा. हळूहळू एका पाठोपाठ नवनवीन सुधारणा करत प्रदीपने आतापर्यंत जवळपास ७ हॅलिकॉप्टर बनविले आहेत, पहिल्या हॅलिकॉप्टरचे वजन ७०० किग्रॅ होते आणि आता बनविलेल्या हॅलिकॉप्टरचे वजन २५० किग्रॅ आहे. हॅलिकॉप्टर बनविण्यासाठी त्याने दिवसा गॅरेजमध्ये व रात्री हॅलिकॉप्टर बनविण्यासाठी मेहनत घेतली आहे. सध्या त्याने बनविलेले हॅलिकॉप्टरमध्ये ३०० फुटांपर्यंत उंच उड्डाण घेऊ शकत असल्याचे तो सांगतो.    प्रायोगिक तत्वावर निर्मित सेवन फायटरमध्ये सुधारणा गरजेची सेवन फायटर हॅलिकॉप्टरमध्ये अजून आणखी सुधारणा करणे गरजेचे आहे. परंतु संशोधन करण्यासाठी आर्थिक पाठबळ असायला हवे..? हॅलिकॉप्टर बनविण्याच्या हौसेने झपाटलेल्या प्रदीपला कुटुंबाच्या खर्चाची काळजी आहे. त्यामुळे संशोधनाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक नगरीत गॅरेजच्या व्यवसायात जम बसेल. त्यातून येणाऱ्या पैशाचा हॅलिकॉप्टरच्या संशोधनासाठी वापर करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मोठ्या आशेने औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलो. राज्यशासन, केंद्रशासन यांनी मेक इन इंडिया अंतर्गत हॅलिकॉप्टरच्या संशोधनास मदत करावी. तसेच एखाद्या उद्योजकाने माझ्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला आर्थिक पाठबळ द्यावे ही अपेक्षा असल्याचे हॅलिकॉप्टर मॅन प्रदीप मोहिते याने सांगितले.........................आतापर्यंत प्रदिपने बनविलेल्या हॅलिकॉप्टरच्या सॉस प्लेट, इंजिन, ऑटोमॅटीक क्लच, पायलट ट्रेनिंग ब्रॅकेट, चेन ड्राइव्ह या पार्टला पेटंट मिळाले असून यासाठी वकील असलेल्या मावशी उर्मिला जाधव यांनी मदत केली आहे. ...........पुढील योजनाड्रोन, फ्लाइंग कार तसेच भारतीय सैन्यासाठी सुरक्षित कम्वो हॅलिकॉप्टर बनविण्याची जिद्द प्रदीप मोहिते या तरूणाने बाळगलेली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtalawadeतळवडे