शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

हॅलो १०८, चार वर्षांत रुग्णांमध्ये पाच पट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 4:17 PM

राज्याच्या आरोग्य विभागाने २०१४ मध्ये प्रजासत्ताक दिनापासून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत ‘१०८’ ही मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली.

ठळक मुद्देराज्यात एकूण ९३७ रुग्णवाहिका असून त्यामार्फत २४ तास अखंडित सेवारुग्णवाहिकेत २४ तास प्रशिक्षित डॉक्टर व चालक २०१४ मध्ये सुमारे १ लाख ९२ हजार रुग्णांना या सेवेमुळे जीवनदान साडे चार वर्षांत तब्बल ३२ लाख ९७ हजार रुग्णांना ‘१०८’ची साथ गर्भवती महिलांना होणारा त्रास, प्रसुती यासाठी १०८ रुग्णवाहिकेचा खुप फायदाचार वर्षांत रुग्णांमध्ये पाच पट वाढ

पुणे : अपघात असो की हृदयविकाराचा झटका, भोवळ असो गर्भवती महिलेला त्रास... अशा कोणत्याही आपत्कालीन स्थितीत ‘१०८’ ही रुग्णवाहिका राज्यभरातील रुग्णांच्या सेवेला धावून जात आहे. जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत ३३ लाख रुग्णांना या सेवेने आधार दिला आहे. त्यामुळे वर्षागणिक या सेवेला नागरिकांचा प्रतिसाद वेगाने वाढत चालला आहे.राज्याच्या आरोग्य विभागाने २०१४ मध्ये प्रजासत्ताक दिनापासून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत ‘१०८’ ही मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली. राज्यात एकूण ९३७ रुग्णवाहिका असून त्यामार्फत २४ तास अखंडित सेवा दिली जात आहे. यापैकी ८२ रुग्णवाहिका पुणे जिल्ह्यात आहेत. बी. व्ही. जी. इंडिया या कंपनी मार्फत ही सेवा पुरविली जात आहे. गेल्या साडेचार वर्षात वाहन अपघात, मोठे अपघात, दुखापती, मारहाण, उंचावरून पडणे, भाजणे, हृदयविकाराचा झटका, विषबाधा, गर्भवती प्रसूती, विद्युत झटका अशा कोणत्याही आपत्कालीन स्थितीत १०८ रुग्णवाहिका अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहचली आहे. रुग्णवाहिकेत २४ तास प्रशिक्षित डॉक्टर व चालक असतात. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३,२७,७२४ रुग्णांना या सेवेने आधार दिला आहे. त्यापाठोपाठ मुंबई, नागपुर, सोलापुर, औरंगाबाद या जिल्हांत या सेवेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. मागील साडे चार वर्षात सेवेला मिळणारा प्रतिसाद दिवसागणिक वाढतच चालला आहे. २०१४ मध्ये सुमारे १ लाख ९२ हजार रुग्णांना या सेवेमुळे जीवनदान मिळाले. हा आकडा दि. ११ आॅक्टोबर २०१८ पर्यंत तब्बल १२ लाखांच्याही पुढे गेला आहे. साडे चार वर्षांत तब्बल ३२ लाख ९७ हजार रुग्णांना ‘१०८’ची साथ मिळाली. ----------------काही जिल्ह्यांतील मागील चार वर्षातील रुग्णांची स्थिती जिल्हा    २०१४    २०१५    २०१६    २०१७    २०१८ (सप्टेंबरअखेरपर्यंत)पुणे         १३,९०७    २७,१९७    ७७,२१४    ८८,८१७    १,२०,५८९मुंबई        १६,१३७    २७,२१७    ३५,०२७    ३७,०६२    ७३,३५९नागपुर    ७,४०३    १७,१०६    २६,६७५    २९,१९३    ६०,७८२सोलापूर    ८,७८९    १५,५१९    ६२,०३४    ६६,६२९    ५९,०९९औरंगाबाद    ९,०२२    १५,६३७    २७,२९९    ३३,७८५    ४६,५४०---------------------जानेवारी २०१४ पासून ११ आॅक्टोबरपर्यंतचे एकुण रुग्ण-वर्ष        एकुण रुग्णसंख्या२०१४        १,९२,०४५२०१५        ४,०१,३११    २०१६        ६,८४,५६०२०१७        ७,९८,२५१२०१८        १२,२१,५१३(दि. ११ आॅक्टो.)    एकुण        ३२,९७,६८०------------------------------रुग्णांना चांगली सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न केला आहे. गेल्या साडेचार वर्षामध्ये आषाढी वारी ,गणेशोत्सव, मॅरेथॉन, नवरात्री उत्सव यांसह विविध मोठ्या उत्सवांमध्ये पूर्वनियोजन करून वैयकीय सेवा दिली. नागरिकांकडून या सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.- विठ्ठल बोडखे, विभागीय व्यवस्थापक-------------गर्भवती महिलांना होणारा त्रास, प्रसुती यासाठी १०८ रुग्णवाहिकेचा खुप फायदा होत आहे. मागील साडे चार वर्षात ७ लाख ४४ हजार २२३ गर्भवती महिलांना सेवा देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ २ लाख ७० हजार रुग्णांना विविध अपघातांच्या ठिकाणी सेवा देण्यात आली. विषबाधेच्या घटनांमध्येही सुमारे ९८ हजार रुग्णांना या रुग्णवाहिकांमधून सेवा पुरविण्यात आली.आपत्कालीन स्थितीत सेवा (जानेवारी २०१४ ते जुन २०१८ अखेरपर्यंत)वैद्यकीय - १३,२३,७४६गर्भवती महिला - ७,४४,२२३वाहन अपघात - २,७०,८३३विषबाधा - ९७,८८५........... 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल