मुंबई : राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने अनेक शेतकरी कुटुंबांसह मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. या शेतकऱ्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्याची एकमुखी मागणी पालिकेच्या महासभेत आज करण्यात आली़ त्यानुसार मोकळे भूखंड, शाळा व वॉर्डस्तरावरील निवारा केंद्रामध्ये राहण्याची व अन्न, पाण्याची सोय, दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेण्याचे निर्देश महापौर स्नेहल आंबेकर यांनी प्रशासनाला या वेळी दिले़महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे़ अशा वेळी अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्न सोडविणाऱ्या मुंबईकडे हा शेतकरी आशेने बघत आहे़ शेतकरी कुटुंबांसह रोजगार मिळवण्यासाठी मुंबईत येत आहेत़ अनेक संस्था आपल्यापरीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करीत आहेत़ अशा वेळी मुंबईची पालक संस्था असलेल्या महापालिकेनेही पुढाकार घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी निवेदनाद्वारे केली़ दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेण्याची मागणीही पुढे आली़ तर काहींनी शाळांची जागा, मोकळे भूखंड या शेतकऱ्यांना निवाऱ्यासाठी देण्याची सूचना केली़ (प्रतिनिधी)
‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा’
By admin | Published: April 19, 2016 3:57 AM