लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून नाराज प्राचार्य आणि प्राध्यापकांनीही जोमाने कामाला सुरुवात केली आहे. उत्तरपत्रिका तपासणीला वेग आला आहे. रविवारी पुणे विद्यापीठ मुंबई विद्यापीठाच्या मदतीला धावून आले आहे. पुणे विद्यापीठाचे विशेष अधिकारी रविवारी दिवसभर कॅम्पसमध्ये उपस्थित होते, त्यांनी मदत केली, प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी अनेक सूचना केल्या.उत्तरपत्रिका तपासणी कशा पद्धतीने सूरू आहे याची पाहणी करण्यासाठी रविवारी राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव सिद्धार्थ खरात यांनी विद्यापीठाला भेट दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.रविवारीही विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी ७१० प्राध्यापकांनी हजेरी लावली होती. सर्व प्राध्यापकांनी सुरू केलेल्या कामामुळे आतापर्यंत १५ हजार ७२५ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केल्याचे कळते. गेल्या रविवारपर्यंत फक्त ९८ प्राध्यापक पेपर तपासणीसाठी हजर होते. तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आकडा २ हजार ७६ इतका होता. आता तो दुप्पट झाला. प्राध्यापकांची नाराजी दूर झाल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीला वेग प्राप्त झाला.
पुणे विद्यापीठाची मुंबई विद्यापीठाला मदत
By admin | Published: July 10, 2017 5:42 AM