शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

मदतीचा हात ! मुसळ'धार' पावसात कौतुकास्पद कामगिरी करणा-या मुंबई पोलिसांना सलाम  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 12:11 PM

मुसळधार झालेल्या पावसानं मंगळवारी मुंबईकरांना चांगलंच झोडपलं. यामुळे मुंबईकरांसह मुंबईबाहेरुन आलेल्या नागरिकांचीही पुरती दाणादाण उडाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती तर पाण्यात गेलेल्या मुंबईनं पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलैच्या आठवणीनं धडकी भरली होती.

मुंबई, दि. 30 - मुसळधार झालेल्या पावसानं मंगळवारी मुंबईकरांना चांगलंच झोडपलं. यामुळे मुंबईकरांसह मुंबईबाहेरुन आलेल्या नागरिकांचीही पुरती दाणादाण उडाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती तर पाण्यात गेलेल्या मुंबईनं पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलैच्या आठवणीनं धडकी भरली होती. मात्र, भर पावसातही माणुसकीला पूर आल्याचे यावेळी पाहायला मिळाले. प्रशासनासहीत सर्वसामान्य मुंबईकरांनी एकमेकांना सहकार्याचा हात पुढे करत मुंबई स्पिरीटचे दर्शन घडवलं. मुंबई पोलिसांनीही वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेरुन मुंबईत दाखल झालेल्या नागरिकांना मदत केली. कमरेपर्यंत साचलेल्या पाण्यात संपूर्ण दिवस उभे राहून मुंबईकरांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. 

मध्य प्रदेशातील शरवैया कुटुंबीयांना मुंबई पोलिसांमुळे मिळाला आसरामध्य प्रदेशातून शरवैया कुटुंबीय त्यांच्या 7 वर्षीय मुलीला घेऊन बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आले होते. शैलेंद्र शरवैया (वय 32), मनिषा शरवैया (वय 34), सखेश पटेल (वय 34) आणि नेहा शरवैया (वय 7) हे सर्वजण मध्य प्रदेशातून मुंबईत आले होते. वैद्यकीय उपचार झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. मात्र मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प असल्यानं शरवैया कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांकडे ट्विटरद्वारे मदत मागितली. यावेळी पोलिसांनी तात्काळ त्यांना मदत करुन मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात शरवैया कुटुंबीयांची संपूर्ण व्यवस्था केली.

तसंच धुळे जिल्ह्यातून आझाद मैदानावर मोर्चासाठी आलेल्या काही महिलादेखील मुसळधार पावसामुळे अडकल्या होत्या. पूजा थोरात, वर्षा शिरसाट, नीता भालेराव,  शीतल थोरात, माधुरी परदेशी, सविता निकम, विजया क्षीरसागर,भावना सोनावणे, प्रीती कोळी, आम्रपाली  बागुल, जयश्री पाटील या सर्व नर्स महिला आझाद मैदान येथे मंगळवारी दाखल झाल्या होत्या. अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा पूर्ण बंद असल्याने त्यांनी 100 नंबरवर संपर्क साधला असता त्यांना तात्काळ पोलीस मदत मिळाली. या महिलांचीही पोलीस आयुक्त मुंबई कार्यालयात योग्य ती व्यवस्था करण्यात आली.

मुंबई हळूहळू येतेय पूर्वपदावर

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी रात्रीपासून मुंबईकरांना अल्पोपहार व जेवण पुरवण्याचे काम नौदलातर्फे सुरू आहे. दुपारीही आणखी 700 लोकांसाठी पुरेल इतके अन्नाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कमांडर अनिरुद्ध मेहता यांनी लोकमतला दिली. 

घाटकोपर रेल्वे स्टेशन

 

 

सीएसटी स्थानकावर प्रवाशांचा मुक्काममुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवासी लोकलची वाट पाहत आहेत. मंगळवारी रात्रीपासून ठप्प असलेली लोकल सेवा अद्याप येथून सुरू झालेली नाही. त्यामुळे रेल्वे सेवा सुरू होईपर्यंत फलाटावरच मुक्काम करण्याच्या विचारात प्रवासी दिसत आहेत. मध्ये रेल्वे प्रशासनाकडून दादर, ठाणे, कल्याण या मुख्य स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र तांत्रिक कारणास्तव पुढील लोकल कधी सुरू होईल हे सांगता येत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  दरम्यान, लोकलच्या प्रवाशांमुळे एक्स्प्रेस गाड्यांमध्येही प्रचंड गर्दी झाली आहे.  

माहीम परिसरात टॅक्सीवर कोसळले झाड

 

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकारMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका