शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

अमोल यादवच्या कंपनीला मदत

By admin | Published: April 01, 2017 3:47 AM

आपल्या घराच्या गच्चीवर विमान तयार करणाऱ्या अमोल यादव या तरुणाला सरकारी मदतीचे पंख मिळाले आहेत

मुंबई : आपल्या घराच्या गच्चीवर विमान तयार करणाऱ्या अमोल यादव या तरुणाला सरकारी मदतीचे पंख मिळाले आहेत. यादव यांना राज्य सरकारकडून पालघरमध्ये १५७ एकरचा भुखंड मिळणार असून, तेथे सहा आसनी आणि वीस आसनी विमान बनविण्याचा कारखाना तो उभा करणार आहे. जेट एअरवेजमध्ये डेप्युटी चिफ पायलट असलेल्या अमोलने कांदिवलीतील चारकोप येथील घराच्या गच्चीवर सहा आसनी विमान बनविले होते. गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहात हे विमान ठेवण्यात आले होते. यादव यांची कल्पकता पाहून प्रभावित झालेल्या राज्य सरकारने आता त्यांना १५७ एकर जमीन पालघरमध्ये देऊ केली आहे. तेथे ते आपल्या थ्रस्ट इंडिया कंपनीमार्फत सहा आसनी आणि वीस आसनी विमानांची निर्मिती करणारा उद्योग उभा करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादव यांना सरकार मदत करीत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, यादव यांच्यासोबतच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनाही बोलावण्यात आले आहे. डीजीसीएच्या विमान सुरक्षा अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यादव यांनी सांगितले की, माझे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. १९९५मध्ये मी अमेरिकेत प्रशिक्षणासाठी गेलो होतो. जुन्या विमानांचे सुटे भाग वापरून स्वत:चे विमान तयार करणारे असंख्य लोक मला तिथे भेटले. त्यात अनेक जण मध्यमवर्गीय होते. तेथून मला प्रेरणा मिळाली. आपण आपली विमाने स्वत: बनवायला लागलो, तर भारतीय विमान उड्डाण क्षेत्रात क्रांती येईल.यादव म्हणाले की, माझ्यासमोरील या पुढचा मोठा प्रश्न भांडवलाचा राहणार आहे. मी एकच सहा आसनी विमान बनविले. त्यावर काही कोटी रुपये खर्च झाले. यावरून खर्चाची कल्पना यावी. सरकारकडून बीज भांडवल मिळाल्यास मला मदत होईल.असे आहे विमानहे विमान १,५00 फूट प्रति मिनीट या वेगाने १३ हजार फूट उंच झेप घेऊ शकते. ते एका वेळी २ हजार किमी उड्डाण करू शकते. त्याची गती प्रतितास १८५ हवाई मैल आहे. ते सध्या धुळ््याच्या विमानतळावर ठेवले आहे.