शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

परीक्षेचे दडपण दूर करण्यासाठी हेल्पलाइन

By admin | Published: February 27, 2017 5:18 AM

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली

प्राची सोनवणे,नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांच्या मदतीला यंदाही बोर्डाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनचा वापर करून परीक्षेच्या सेंटरची खात्री, मनातील परीक्षेविषयीची भीती, तणाव, वेळापत्रक यावर विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही मार्गदर्शन केले जाणार आहे. ही हेल्पलाइन २७ फेब्रुवारीपासून ते १ मार्च या कालावधीत सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.बारावी बोर्डाची परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार असून, एक दिवसावर येऊन ठेपलेल्या या परीक्षेच्या वेळी निराशा, तसेच अभ्यासाबाबत तक्रारींविषयीच्या समस्या विद्यार्थ्यांनी या हेल्पलाइनवर मांडता येणार आहेत. गेल्यावर्षी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास लक्षात राहत नाही, घाबरगुंडी उडाली आहे, पोटात गोळा आला, परीक्षेत कमी गुण मिळाले तर, अशा चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नांनी समुपदेशकही हैराण झाले होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही तितकेच त्रस्त आहेत, असे असून पाल्याच्या अभ्यासाविषयी तक्रारी, परीक्षेच्या वेळापत्रकाविषयी खात्री करण्यासाठी पालकांनीही या हेल्पलाइनचा आधार घेतला आणि घेत असल्याची माहितीही शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली. मुंबई विभागातील समुपदेशक श्रीकांत शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी परीक्षेला जाण्याअगोदर परीक्षार्थी या हेल्पलाइनचा आधार घेत परीक्षा केंद्राची खात्री करून घेतात. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान व्हावे, यासाठी समुपदेशकांकडून पुरेपूर खात्री करून घेतली जाते, असेही शिनगारे यांनी स्पष्ट केले.>१२ समुपदेशकांची नियुक्तीमुंबई विभागातून १२ समुपदेशकांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आली आहे. शनिवारपासूनच समुपदेशकांचा फोन खणाणू लागला असून, दोन दिवसांत ५० विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्याची माहिती समुपदेशक श्रीकांत शिनगारे यांनी दिली. बोर्डाची हेल्पलाइन सोमवारी २७ फेब्रुवारीपासून सुरू होत असून आसन व्यवस्था, परीक्षा केंद्र आदींची माहिती या हेल्पलाइनवर मिळेल. मात्र, बैठक व्यवस्था, हॉल तिकीट, केंद्राविषयीची माहिती समुपदेशकांना विचारू नये, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशकांची निवड केल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली.>मुंबई विभागीय मंडळाचा हेल्पलाइन क्रमांक : २७८९३७५६/२७८८१०७५>समुपदेशनाकरिता खालील क्रमांकावर संपर्क साधावाश्रीकांत शिनगारे - ९८६९६३४७६५अशोक सरोदे - ८८८८८३०१३९चंद्रकांत मुंढे - ९८६९३०७६५७अनिलकुमार गाढे - ९९६९०३८०२०स्मिता शिपुरकर - ९८१९०१६२७०