ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - सुप्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय व त्यांचे वकील हरिश भांबानी हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीना १९ तारखेपर्यंत नायालयीन कोठडीत ठेवण्याचं आदेश देण्यात आले आहेत. कलाकार हेमा उपाध्याय आणि त्यांचा वकील हरिष भंबानी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून संशयीतानां अटक केली होती.
त्या आरोपीत विद्याधर राजभर ऊर्फ गोटू, विजय राजभर ऊर्फ विकास, शिवकुमार ऊर्फ साधू, देवेंद्र व प्रतीक या पाच जणांना समावेश आहे. सर्वांना आज बोरिवलीच्या मेट्रोपॉलिटन न्यायालयात सादर केले असता सर्वांना १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध भादंसंच्ये कलम ३०२,३४ आणि २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवकुमार राजभार या मुख्य आरोपीला वाराणसीतून अटक केली तर प्रदीप राजभार, आझाद राजभार आणि विजय राजभार या तिघांना मुंबईतून अटक करण्यात आली.
असे घडले हत्याकांड
विद्याधर राजभरच्या मालकीच्या गाळ्यात ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’पासून विविध शिल्प तयार करण्याचे काम चालते. येथेच विद्याधर व त्याच्या चार साथीदारांनी हे हत्याकांड घडविले. नंतर विजय राजभर ऊर्फ विकास टेम्पोवाला याचा टेम्पो बुक केला. दोघांचे मृतदेह हे टाकाऊ सामान असल्याचे भासवत ते चालकाच्या मदतीने लालजीपाडा नाल्यात टाकले. मात्र दुसऱ्या दिवशी हे मृतदेह नाल्यात सापडल्याचे वर्तमानपत्रात झळकताच विकासने स्वत:हून पोलिसांना माहिती दिली.
घटनाक्रम
११ डिसेंबर २०१५
सायंकाळी ६.३० - वकील हरिश भंबानी यांनी हेमा यांना भेटण्यासाठी घर सोडले त्यानंतर थेट अंधेरी येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज स्टुडिओमध्ये हेमा आणि भंबानी भेटले
१२ डिसेंबर २०१५
सकाळी ११.३० - माटुंगा पोलीस ठाण्यात भंबानी हरविल्याची तक्रार
सकाळी ११ वाजता - सांताक्रुझ पोलीस ठाण्यात हेमा हरविल्याची तक्रार
सायंकाळी ७ वाजता - डहाणूकर वाडीतील नाल्यात दोघांचाही मृतदेह सापडला
१९९८ : हेमा आणि चिंतनचा प्रेमविवाह
२०१० : हेमाने चिंतन विरोधात अत्याचाराची पहिली तक्रार दाखल केली
२०१३ : हेमाने कौटुंबिक न्यायालयात धाव
२०१४ : चिंतन उपाध्यायच्या बाजूने न्यायालयाचा निकाल
२०१५ : हेमाचा उच्च न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज
१२ डिसेंबर २०१५ : हेमासह वकील भंबानीची हत्या.