शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
3
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
4
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
5
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
6
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
7
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
8
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
9
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
10
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
11
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
12
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
13
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
15
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
16
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
17
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
18
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
19
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
20
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा

विठ्ठल मंदिराला हेमाडपंती रूप

By admin | Published: April 12, 2016 2:57 AM

शेकडो वर्षांपासून साऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे विठ्ठल मंदिर कात टाकणार असून, पुन्हा एकदा मंदिराला त्याच्या स्थापनेच्या वेळचे मूळ हेमाडपंती रुप येणार आहे.

- दीपक होमकर,  पंढरपूर

शेकडो वर्षांपासून साऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे विठ्ठल मंदिर कात टाकणार असून, पुन्हा एकदा मंदिराला त्याच्या स्थापनेच्या वेळचे मूळ हेमाडपंती रुप येणार आहे. भारतीय पुरातत्व खात्यानेच ही जबाबदारी स्वीकारली असून, चैत्र वारी होताच या कामाला सुरुवात होणार आहे.विठ्ठल मंदिराची निर्मिती कधी झाली याबाबत नेमके दाखले नसले तरी मंदिराची मूळ रचना ही हेमाडपंथी आहे. शिवाय बाराव्या शतकात ज्ञानदेवांचे वडीलही पंढरीच्या वारीला यायचे, असा उल्लेख असल्याने हे मंदिर बाराव्या शतकाच्याही आधीचे असावे असा उल्लेख सापडतो. इतिहास अभ्यासकांच्या मते मुस्लीम राजवटीत हे मंदिर पूर्ण उद्ध्वस्त झाले होते. मात्र मराठ्यांच्या साम्राज्यात साधारण सतरा व अठराव्या शतकात मंदिराचा पुन्हा जीर्णाेध्दार झाला आणि गाभाऱ्यापासून ते मंदिराच्या तटबंदीपर्यंतचा सर्व भाग टप्प्याटप्प्याने बांधण्यात आला. अगदी १९व्या शतकाच्या उत्तरार्धात बडवे आणि उत्पात यांच्या अधिपत्याखालीही मंदिराचे लाकडी सभामंडप, काँक्रीटचा स्लॅब अशा सुधारणा करण्यात आल्या. साधारण १९व्या शतकामध्येच मंदिराच्या भिंती, कळसांना रंगरंगोटी करण्यात आली. शिवाय विठ्ठल मंदिर , महालक्ष्मी मंदिर व तटबंदी यांना जोडणारा स्लॅबही बांधण्यात आला होता. मात्र या स्लॅबच्या वजनाने मंदिराच्या भिंतींना धोका असल्याचा अहवाल पुरातत्व खात्याने दिल्याने मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी हा स्लॅब पाडला व मंदिराला पुरातन काळातील मूळ रुप देण्यास सुरुवात केली.मंदिराची रंगरंगोटी काढून पूर्वीच्या काळातील मूळ गुळगुळीत स्वरूपाच्या काळाकुट्ट दगडी रुपातील मंदिराचा लूक मंदिराला पुन्हा यावा यासाठी सभापती मुंढे यांनी भारतीय पुरातत्व विभागाला प्रस्ताव पाठविला होता़ त्याचा पाठपुरावा करुन तो प्रस्ताव मंजूरही करून घेतला असून, चैत्री वारी होताच या कामाला सुरुवात होणार आहे. ६८ लाखांचा प्रस्तावमूळ रूपात मंदिर पुन्हा साकारण्यासाठी समितीसमोर खासगी कंत्राटदार आणि शासनाचे पुरातत्व विभाग असे दोन पर्याय होते़ समितीने पुरातत्व विभागाला प्राधान्य देऊन याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता. पुरातत्व खात्याकडून मंदिराच्या वास्तूची पाहणी केल्यानंतर याबाबत ६८ लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव दिली होता. तो मंदिर समितीने मान्य करून पुरातन विभागाला काम करण्यास सांगितले आहे. चैत्री वारी संपताच या कामाला सुरुवात होणार असून, आषाढीपूर्वी हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वारीत येणाऱ्या भाविकांना मंदिराचे मूळ पौराणिक रुप पाहायला मिळेल.-शिवाजी कादबाने, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर