शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

अहो, आश्चर्यम...मंत्री बसेचिनात!

By admin | Published: October 07, 2016 6:10 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसाठी मंत्रालयातील ‘उपस्थिती’साठी वेळापत्रक आखून दिले असले

अतुल कुलकर्णी, मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसाठी मंत्रालयातील ‘उपस्थिती’साठी वेळापत्रक आखून दिले असले, तरी भाजपा-शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्याकडे पाठ फिरवून ‘दांडी’ मारण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. आठवड्यातून एकदा मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईत आलेले मंत्री एक-दोन दिवस थांबून गावचा रस्ता धरत असल्याने मंत्रालय अक्षरश: ओस पडले आहे.मंत्रालयातील उपस्थितीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आठवड्याचे वेळापत्रकच सर्व मंत्र्यांना पाठवले व त्यावर त्यांचा अभिप्राय मागविला. परंतु अद्याप एकाही मंत्र्याने आपले मत मुख्यमंत्र्यांना कळविलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी वेळापत्रक तयार करुन देण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिली वेळ. मंत्र्यांना वेळापत्रक तयार करुन द्यावे लागते आणि मंत्रालयात बसा, असे सांगावे लागते यातच सगळे आले! असे वेळापत्रक तयार करुन देण्यामागे फडणवीस यांचा हेतू चांगला असला तरी तो मंत्री पाळायला तयार नाहीत, असे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसाचे अंदाजित वेळापत्रक तयार करुन दिले. त्यात कोणत्या कामासाठी किती वेळ द्यावा हे देखील त्यांनी नमूद केले. अनेक मंत्री सोमवारी सायंकाळपर्यंत मुंबईत पोहोचतात. मंगळवारचा दिवस मंत्रिमंडळ बैठकीत जातो आणि बुधवारी दुपारनंतर अनेकजण आपापल्या मतदारसंघात जायला निघतात. दोन दिवसाच्यावर कोणीही मंत्रालयात थांबायला तयार नसते. अनेक मंत्री तर घरी बसूनच काम पाहातात. अधिकाऱ्यांना बंगल्यावर बोलवले जाते. काही मंत्री तर ट्रॅकसूट घालून बैठका घेतात, अशी अधिकाऱ्यांची तक्रार आहे. पूर्वी मंत्र्यांच्या दालनात गर्दी असायची आता ती गर्दी बंगल्यांवर होताना दिसते आहे. काहींना तर आपल्या दालनापुढे झालेली गर्दी आजही कौतुकाचा विषय वाटते. तर काही मंत्री दिलेल्या वेळेपेक्षा दोन ते तीन तास उशिरा येतात, असेही काही अधिकाऱ्यांचे मत आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी वेळापत्रक तयार केले, पण त्यालाही मंत्री दाद देईनासे झाले आहेत. आघाडी सरकारच्या काळात सगळ्यात जास्तवेळ मंत्रालयात बसणारे मंत्री म्हणून आर.आर. पाटील आणि सुरेश शेट्टी यांचा नंबर होता तर सर्वात कमी काळ मंत्रालयात येणारे मंत्री म्हणून मनोहर नाईक यांचा नंबर आला होता.मुख्यमंत्र्यांनी दिलेले वेळापत्रक असे - वारअंदाजे वेळकार्यक्रमाचे सर्वसाधारण स्वरुपसोमवार१० ते १२शासकीय कामकाज१२ ते १२-३०प्रधान सचिवांच्या भेटीसाठी१२-३० ते १३-३०सचिव, विभागप्रमुख आदींसाठी राखीव१४-०० ते १६-००विभागाशी संबंधीत बैठका, महत्वाच्याधोरणविषयक बैठका१६-०० ते १७-००सर्वसाधारण जनतेच्या भेटीसाठीमंगळवार११-०० ते १४-००मंत्रीमंडळ बैठक१४-०० ते १७-००मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदारबुधवार११-०० ते १७-००- खासदार, आमदारांनी उपस्थित केलेले प्रश्न, विकास कामे संबंधी बैठका- प्रशासकीय विभागाच्या संविधानिकबैठका, धोरणात्मक व प्रशासकीय बैठकागुरुवार११-०० ते १४-००प्रशासकीय विभागाच्या संविधानिक वधोरणात्मक विषयाच्या बैठकाशुक्रवार लोकप्रतिनिधी, शासकीय संस्था, इतर ते रविवारसंस्था, यांनी मागणी केलेले दौरे, राजकीय बैठका, उद्घाटने, शुभारंभ