ठाकरे सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बदलला; 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 01:04 PM2020-08-07T13:04:33+5:302020-08-07T13:06:17+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मनोरंजनसृष्टी मागणी करत होतं. पण ही मागणी सरकारने फेटाळून लावली होती.

High Court gives permission to Actors over 65 are allowed to shooting | ठाकरे सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बदलला; 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी

ठाकरे सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बदलला; 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी

Next

मुंबई : कोरोनामुळे राज्या सरकारने 65 वर्षांवरील कलाकारांना शुटिंगसाठी परवानगी नाकारली होती. तसेच मालिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून चित्रिकरण करण्याची अट घातली होती. यामुळे 65 वर्षे वयाचे कलाकार नाराज झाले होते. या निर्णयाविरोधात कलाकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज न्य़ायालयाने त्यांना परवानगी दिली आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मनोरंजनसृष्टी मागणी करत होतं. पण ही मागणी सरकारने फेटाळून लावली होती.  त्यामुळे ज्येष्ठ कलाकारांना शूटिंगसाठी नो एंट्रीच आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  65 वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्यामुळे त्याला सरकारने परवानगी द्यावी, असेही गोखले म्हणाले होते. 


जर ज्येष्ठ नागरीकांना इतर काम करण्यापासून मज्जाव नाही, तर शूटींगवर जाण्यास बंदी अयोग्य असल्याचे मत हायकोर्टाने नोंदविले आहे. ज्येष्ठ कलाकार प्रमोद पांडे आणि 'इंपा' यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने निर्णय दिला आहे. 


चित्रिकरणासाठी करण्यात आलेले नियम...
चित्रीकरण सुरू झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी चांगल्या दर्जाचे मास्क आणि ग्लोव्हज वापरावेत. 
हस्तांदोलन करणे, मिठी मारणे अथवा किस करणे या गोष्टी टाळणे गरजेचे आहे. प्रत्येकाने एकमेकांमध्ये अधिकाधिक अंतर राखावे.
चित्रपटाच्या सेटवर, प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसेसमध्ये, स्टुडिओमध्ये सिगरेट पिताना ती एकमेकांसोबत शेअर करू नये. 
सेट, ऑफिसेस वेळोवेळी सॅनिटाईज करावीत. 
चित्रीकरणाला उपस्थित असलेल्या लोकांची महिन्यातून एकदा चाचणी करणे अनिर्वाय असेल. 
साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना घरून काम करण्याची मुभा द्यावी. चित्रीकरण सुरू झाल्यावर सेटवर कमीतकमी तीन महिने तरी साठ वर्षांवरील लोकांकडून काम करून घेऊ नये. 
चित्रीकरणाच्या सेटवर चित्रीकरण सुरू व्हायच्याआधी सगळ्यांना ४५ मिनिटं आधी तरी पोहोचावे लागेल.
सेटवर स्वच्छ बाथरूम, वॉश बेसिंग उपलब्ध करून द्यावीत.
केसाला वापरला जाणारा विग वापरण्याआधी आणि नंतर देखील धुवावा.
प्रत्येकाने स्वतःचाच मेकअप किट वापरावा.
मेकअपमन आणि हेअर स्टायलिस्ट यांनी सतत हातात ग्लोव्हज घालणे आणि मास्क घालणे बंधनकारक आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

नाशिक हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची निघृण हत्या; दोन लहान मुलांचाही समावेश

नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा

मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली

‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा; शिवसेना आमदाराचे गृहमंत्र्यांना पत्र

Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??

सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले

आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

Read in English

Web Title: High Court gives permission to Actors over 65 are allowed to shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.