शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

ठाकरे सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बदलला; 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 1:04 PM

गेल्या अनेक दिवसांपासून ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मनोरंजनसृष्टी मागणी करत होतं. पण ही मागणी सरकारने फेटाळून लावली होती.

मुंबई : कोरोनामुळे राज्या सरकारने 65 वर्षांवरील कलाकारांना शुटिंगसाठी परवानगी नाकारली होती. तसेच मालिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून चित्रिकरण करण्याची अट घातली होती. यामुळे 65 वर्षे वयाचे कलाकार नाराज झाले होते. या निर्णयाविरोधात कलाकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज न्य़ायालयाने त्यांना परवानगी दिली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मनोरंजनसृष्टी मागणी करत होतं. पण ही मागणी सरकारने फेटाळून लावली होती.  त्यामुळे ज्येष्ठ कलाकारांना शूटिंगसाठी नो एंट्रीच आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  65 वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्यामुळे त्याला सरकारने परवानगी द्यावी, असेही गोखले म्हणाले होते. 

जर ज्येष्ठ नागरीकांना इतर काम करण्यापासून मज्जाव नाही, तर शूटींगवर जाण्यास बंदी अयोग्य असल्याचे मत हायकोर्टाने नोंदविले आहे. ज्येष्ठ कलाकार प्रमोद पांडे आणि 'इंपा' यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने निर्णय दिला आहे. 

चित्रिकरणासाठी करण्यात आलेले नियम...चित्रीकरण सुरू झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी चांगल्या दर्जाचे मास्क आणि ग्लोव्हज वापरावेत. हस्तांदोलन करणे, मिठी मारणे अथवा किस करणे या गोष्टी टाळणे गरजेचे आहे. प्रत्येकाने एकमेकांमध्ये अधिकाधिक अंतर राखावे.चित्रपटाच्या सेटवर, प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसेसमध्ये, स्टुडिओमध्ये सिगरेट पिताना ती एकमेकांसोबत शेअर करू नये. सेट, ऑफिसेस वेळोवेळी सॅनिटाईज करावीत. चित्रीकरणाला उपस्थित असलेल्या लोकांची महिन्यातून एकदा चाचणी करणे अनिर्वाय असेल. साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना घरून काम करण्याची मुभा द्यावी. चित्रीकरण सुरू झाल्यावर सेटवर कमीतकमी तीन महिने तरी साठ वर्षांवरील लोकांकडून काम करून घेऊ नये. चित्रीकरणाच्या सेटवर चित्रीकरण सुरू व्हायच्याआधी सगळ्यांना ४५ मिनिटं आधी तरी पोहोचावे लागेल.सेटवर स्वच्छ बाथरूम, वॉश बेसिंग उपलब्ध करून द्यावीत.केसाला वापरला जाणारा विग वापरण्याआधी आणि नंतर देखील धुवावा.प्रत्येकाने स्वतःचाच मेकअप किट वापरावा.मेकअपमन आणि हेअर स्टायलिस्ट यांनी सतत हातात ग्लोव्हज घालणे आणि मास्क घालणे बंधनकारक आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

नाशिक हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची निघृण हत्या; दोन लहान मुलांचाही समावेश

नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा

मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली

‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा; शिवसेना आमदाराचे गृहमंत्र्यांना पत्र

Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??

सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले

आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकHigh Courtउच्च न्यायालय