शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'बेरोजगारांना ४ हजार रुपये देणार'; महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला
2
कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अटकेत, दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूशी कनेक्शन
3
लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?
4
बाबा सिद्दिकींवरील हल्ला फेल झाला असता तर पुण्यातील नेता होता टार्गेटवर; बिश्नोई गँगचा प्लॅन B
5
किशोरी गोडबोलेंच्या लेकीची कमाल! थेट ॲपलची ब्रँड अँबेसिडर बनली सई, पोस्ट व्हायरल
6
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!
7
"मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता", अजित पवारांचं रामराजेंना आव्हान
8
परशुराम घाटात पुन्हा भीषण अपघात, एसटी चालकासह एक प्रवासी जखमी, वाहतूक ठप्प
9
धक्कादायक! २५ मुलींना जाळ्यात अडकवलं, लाखो रुपये उकळले; बनावट IRS चा झाला पर्दाफाश
10
"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
11
"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'
12
"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले
13
पान मसालाच्या जाहिरातीवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर अजय देवगणची प्रतिक्रिया, म्हणाला...
14
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ; उत्तम यश-प्रगती, विठ्ठल-रखुमाई शुभच करतील!
15
ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
16
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
17
"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
18
वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते गणेश यांचं निधन, ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम
19
'सिंघम अगेन'मधील सलमान खानच्या कॅमिओवर रोहित शेट्टी म्हणाला, "त्याच्या सुरक्षेमुळे..."
20
भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न

संजय केळकर यांना हायकोर्टाने सुनावले

By admin | Published: January 11, 2017 4:38 AM

राज्यातील ३०० हून अधिक अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालयांनी खोटी माहिती सादर करून ‘आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’कडून (एआयसीटीई) मुदतवाढ घेतल्याचा

मुंबई : राज्यातील ३०० हून अधिक अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालयांनी खोटी माहिती सादर करून ‘आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’कडून (एआयसीटीई) मुदतवाढ घेतल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी जनहित याचिकेद्वारे केला. मात्र केळकरांनी पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यापूर्वीच याचिका दाखल केल्याने उच्च न्यायालयाने त्यांची चांगलीच कानउघडणी केली. हा प्रश्न विधानसभेत मांडा... आधी तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा आणि मगच दुसऱ्यांकडून अपेक्षा करा,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने केळकरांना सुनावले.जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी संबंधित ३४६ महाविद्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा न नोंदवल्याने न्या. अभय ओक व न्या.अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने भाजप आमदार संजय केळकर यांना चांगलचे खडसावले. ‘तुम्ही (केळकर) हा प्रश्न विधासभेत उपस्थित करू शकला असता...आधी तुमचे कर्तव्य पार पाडा मगच दुसऱ्यांकडून अपेक्षा करा,’ अशा शब्दांत खंडपीठाने केळकर यांना धारेवर धरले.‘बाकीचे (महाविद्यालये) कायदे पाळत नसून बेकायदेशीर काम करत असल्याबद्दल तुम्ही न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र तुम्हीही तेच केलेत. आधी पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती. त्यावर पोलिसांनी कारवाई केली नसती तरच तुम्ही न्यायालयात यायला हवे होते. तुम्ही विधानसभेचे सदस्य आहात. सामान्य माणसापेक्षा नक्कीच मोठे (पद आणि अधिकार) आहात. तुम्ही हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करू शकला असता. तुम्ही कधी प्रयत्न केलात का? आधी तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा मगच दुसऱ्यांनी त्यांची कर्तव्य पार पाडण्याची अपेक्षा करा,’ असे सुनावत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी ठेवली. (प्रतिनिधी)  सिटीझन फोरम फॉर सॅन्टीटी इन एज्युकेशल सिस्टीम’ हा केळकरांचा ट्रस्ट असून या ट्रस्टने उच्च न्यायालयाने जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, संबंधित ३४६ महाविद्यालयांनी ट्रस्टचे विश्वस्त व प्राचार्यांच्या सहमतीने महाविद्यालयांना मुदत मिळवण्यासाठी एआयसीटीईला बनावट कागदपत्रे व खोटी माहिती दिली. फसवणूक करून दरवर्षी मुदतवाढ घेणाऱ्या महाविद्यालयांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात यावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.