सिंचन घोटाळ्यातील आरोपपत्रांवर दररोज सुनावणीसाठी विशेष कोर्टाची स्थापना करण्याचे हायकोर्टाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 12:48 PM2018-07-19T12:48:50+5:302018-07-19T12:52:30+5:30
सिंचन घोटाळ्याप्रकरणी गुन्ह्यांच्या संदर्भात दाखल आरोपपत्रांची सुनावणी दररोज व्हावी यासाठी विशेष कोर्टाची स्थापना करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
Next
नागपूर - सिंचन घोटाळ्याप्रकरणी गुन्ह्यांच्या संदर्भात दाखल आरोपपत्रांची सुनावणी दररोज व्हावी यासाठी विशेष कोर्टाची स्थापना करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. सिंचन घोटाळ्याबाबत एसीबीच्या तपासाला झालेली दिरंगाई आणि राजकीय नेत्यांच्या चौकशीसाठी दाखवण्यात आलेली हलगर्जी यामुळे संतप्त झालेल्या न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
Maharashtra: Nagpur Bench of Bombay High Court has ordered to set up a special court for daily hearing of Vidarbha Irrigation Scam.
— ANI (@ANI) July 19, 2018
सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीचा तपासाला दिरंगाई का झाली याची चौकशी करण्यासाठी आणि या घोटाळ्यात गुतलेल्या राजकीय नेत्यांच्या चौकशी संदर्भात केलेल्या हलगर्जी संदर्भात चौकशी समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारला आदेश दिले आहेत. सिंचन घोटाळ्यासंदर्भात दाखल पाच एफआयआर संदर्भात आरोपपत्र दाखल करण्यासंदर्भात सरकारने एसीबीला सरकारने आठवड्या भर्यात मंजुरी द्यावी असेही हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.